ब्रेकिंग

सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान

जाहिरात
सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान

सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार पुरस्कार प्रदान
संगमनेर । प्रतिनिधी । विद्यार्थी व तरुणांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणारे विधान मंडळातील अभ्यासू युवक लोकप्रतिनिधी आणि नाशिक पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय युवक आमदार सत्यजित तांबे यांना यावर्षीच्या आदर्श युवा आमदाराने पुणे येथे शानदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.पुणे येथे जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने झालेल्या शानदार कार्यक्रमात आमदार सत्यजित तांबे यांना आदर्श युवा आमदार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार कैलास पाटील, मनसे नेते गजानन काळे , युवा नेते शार्दुल जाधव यांच्या सह पुणे येथील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.युवक चळवळीच्या माध्यमातून सत्यजित तांबे यांनी राज्यभर कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. चांदा ते बांधा अशी कार्यकर्त्यांची मोठी फळी असून नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवल्यानंतर शिक्षक ,वकील, डॉक्टर, इंजिनिअर, बेरोजगार, अंगणवाडी सेविका, शेतकरी ,शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांबाबत सातत्याने विधान परिषदेत आवाज उठवला आहे.याचबरोबर युवकांच्या कला व क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरावर भव्य क्रीडा संकुलासह तालुका स्तरावर विविध गावांमधून लायब्ररी सुरू करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. यामधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व इतर अभ्यासाकरता मोठी संधी उपलब्ध होणार आहे.युवकांसाठी सातत्याने झटणारा नेता अशी आमदार सत्यजित तांबे यांची ओळख असून विविध भाषांवरील प्रभुत्व , विविध विषयांचा अभ्यास यामुळे महाराष्ट्रात त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे.हा पुरस्कार मिळाल्या नंतर आमदार  तांबे म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर आपण समाजकारण करत असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, व आई सौ दुर्गाताई तांबे यांचे मार्गदर्शन आपल्यासाठी मोलाचे राहिले आहे .या पुढील काळातही महाराष्ट्रातील युवकांसाठी राजकारण विरहित सातत्याने काम करण्यासाठी आपले पहिले प्राधान्य राहील असे ते म्हणाले.

तर आमदार हेमंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्राला सत्यजित तांबे यांच्यासारख्या युवा आमदारांची गरज आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांचे अहमदनगर, नाशिक ,धुळे ,नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांसह राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!