ब्रेकिंग
अॕड. रविंद्र बोरावके यांची ” ग्रिड इंडिया “च्या संचालक पदी नियुक्ती

अॕड. रविंद्र बोरावके यांची ” ग्रिड इंडिया “च्या संचालक पदी नियुक्ती

अॕड. रविंद्र बोरावके यांची ” ग्रिड इंडिया “च्या संचालक पदी नियुक्ती
कोपरगांव । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारी पतसंस्था चळवळीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कोपरगाव येथील ज्योती पतसंस्थेचे संस्थापक तथा भारत संचार निगम ( बी एस एन एल )चे संचालक अॕड रवींद्र बोरावके यांची आता देशाच्या सर्व राज्यांना वीजपुरवठा नियंत्रण करणाऱ्या देश पातळीवरील ग्रिड इंडिया च्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे .

भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मालकीखाली कार्यरत असलेल्या वीज प्रेषण आणि वितरण प्रणालीशी संबंधित देश पातळीवरील सर्व राज्यांना वीज पुरवण्यात महत्त्वाची भूमिका निभावत भारत सरकारच्या नवरत्न व महारत्न दर्जा मिळवणाऱ्या ग्रिड इंडिया कंपनीच्या संचालकांची नियुक्ती ही भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्वारे केली जाते अशा ग्रिड इंडिया कंपनीच्या संचालक पदी काम करण्याची संधी अहिल्यानगर जिल्ह्याला अॕड रविंद्र बोरावके यांच्या रूपाने मिळाली असल्याने या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या आधी अॕड.रविंद्र बोरावके यांनी पतसंस्था चळवळीत ठेवीदारांचा विश्वास संपादन करून अहिल्यानगर जिल्ह्यात सहकारात अग्रणी असलेल्या ज्योती सहकारी पतसंस्थेला नावारूपास आणले .त्यानंतर बी.एस.एन.एल या सार्वजनिक कंपनीत आपल्या कामाचा ठसा उमटवला.आता त्यांची भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी दखल घेऊन पुन्हा एकदा देशपातळीवर काम करण्याची संधी मिळाली असल्याचे मानले जाते या निवडी बद्दल अॕड रविंद्र बोरावके यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.