आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून अतिरिक्त पावर ट्रांसफार्मरसाठी 10 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर
तळेगाव, हिवरगाव पावसा, देवगाव, पिंपारणे, निंबाळे व रहिमपूर चा समावेश

संगमनेर । विनोद जवरे ।

नवीन अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर ला मिळालेल्या निधीबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी अविश्रांत कामातून तालुका विकासाचे मॉडेल बनवला आहे. संगमनेर हा सहकार शिक्षण कृषी आर्थिक समृद्धी याबाबत इतर तालुक्यांना दिशादर्शक आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडेच्या कालव्यासाठी भरीव निधी मिळवण्याबरोबरच तालुक्यातील रस्त्यांसह, पाणीपुरवठा योजना व इतर कामांसाठी आमदार थोरात यांनी भरीव निधी मिळवला होता . महाविकास आघाडी सरकारच्या कृषी ऊर्जा धोरण 2020 अंतर्गत तालुक्यातील ऊर्जा विषयक पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी तळेगाव दिघे, हिवरगाव पावसा,देवगाव, पिंपारणे, निंबाळे व रहिमपूर या गावांकरता 33 kV, 5 MVA अतिरिक्त पावर ट्रान्सफर साठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी 10 कोटी 40 लाख रुपयांचे निधीसाठी पाठपुरावा केला होता.

नुकताच हा निधी मंजूर झाला आहे. नव्याने मंजूर झालेल्या या निधीतून अतिरिक्त पावर ट्रांसफार्मर मिळणार असल्याने या गावांना जोडणाऱ्या गावांसाठी वीजपुरवठा सुरळीत होऊन पूर्ण दाबाने मिळण्यास मोठी मदत होणार आहे . यामुळे तळेगाव, हिवरगाव पावसा, देवगाव, पिंपरणे, निंबाळे व रहिमपूर येथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व गावांमधील शेतकरी व नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे