ब्रेकिंग

महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या – नामदार ललित गांधी

महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या – नामदार ललित गांधी

शिर्डी येथील जैन समाजाच्या बैठकीत संकल्प

शिर्डी । प्रतिनिधी ।

शिर्डी शहरात नुकतीच जैन समाजाची बैठक पार पडली यावेळी जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार ललित गांधी भाजपा जैन प्रकोष्टचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी महामंत्री विकास अच्छा पुखराज लोढा रतिलालजी लोढा विजय पारख विनोद संकलेचा सतीश गंगवाल गोकुळ ओस्तवाल पंकज लोढा आदी सह विविध मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली यावेळी बोलताना नामदार ललित गांधी म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रातील महायुती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतर महाराष्ट्रातील जैन समाजाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जैन अल्पसंख्याक महामंडळाची स्थापना करण्यात आली त्याबरोबर जैन समाजाला न्याय देण्यासाठी विविध असे धोरणात्मक निर्णय देखील घेण्यात आले त्यामुळे महायुतीचे उमेदवार नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना शिर्डीसह राहता तालुक्यातील जैन बांधवांनी एक विचाराने मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन ललित गांधी यांनी आपल्या भाषणात केली


नामदार ललित गांधी म्हणाले की हे सरकार केवळ घोषणा करणारे सरकार नसून सर्वसामान्य सर्व धर्मीयांचे प्रश्न मार्गी लावणारे व वचनपूर्ती करणारे सरकार आहे जैन समाजातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावली असून येत्या २० तारखेला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी संदीप भंडारी विकास अच्छा पुखराज लोढा रतिलाल लोढा विनोद संकलेचा सतीश गंगवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना शिर्डी शहरातील व भाजप जैन प्रकोष्टचे सहसचिव विनोद संकलेचा म्हणाले की महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेहमीच आपल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून राहता तालुक्यातील जैन समाजाला देखील मोठ्या प्रमाणावर पाठबळ व न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जैन समाजाच्या हितासाठी काम करून विविध कामे मार्गी लावून आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे शिर्डी शहरात व राहता तालुक्यात देखील जैन बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून येत्या २० तारखेला नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आव्हान विनोद संकलेचा यांनी आपल्या भाषणात केले यावेळी जैन समाजाच्या वतीने विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी संजय संकलेचा महावीर गांधी, वैभव बाठीया, योगेश डोसी, मनोज कोठारी, जोगेश लोढा ,प्रशांत कोठारी, फकीरा लोढा, नरेश सुराणा, शिखरचंद कासलीवाल, संदीप पारख, धीरज लोढा, मोहित गंगवाल,अनिल लोढा, राजेंद्र गंगवाल, निलेश संकलेच्या आधीसह शिर्डीसह परिसरातील जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!