ब्रेकिंग
बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध – शिवसेनाप्रमुख नितीनराव औताडे
कोपरगाव येथे बांधकाम सेना शाखेचे उद्घाटन

बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध – शिवसेनाप्रमुख नितीनराव औताडे

बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना कटिबद्ध – शिवसेनाप्रमुख नितीनराव औताडे
कोपरगाव येथे बांधकाम सेना शाखेचे उद्घाटन
कोपरगाव । प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व घटकांना न्याय दिला आहे.सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेच्या बांधकाम सेनेच्या शाखा सुरू करण्याचे काम चालू आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी व कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या इतर प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.

ते कोपरगाव येथे शिवसेनेच्या बांधकाम सेनेच्या शाखेचे उद्घाटन करताना बोलत होते. उत्तर नगर जिल्ह्यात कोपरगाव येथे प्रथमच गांधीनगर व सोनारवस्ती येथे बांधकाम सेनेची शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी विशाल शिरसाट, इम्रान शेख, बाळासाहेब रहाणे, विमलताई पुंडे, मनील नरोडे, अभिषेक आव्हाड, शिवाजी जाधव, अक्षय जाधव, सनी गायकवाड, रवींद्र जाधव, बाबासाहेब भालेराव, ज्ञानेश कपिले, विनोद गलांडे, किशोर चोरगे, मच्छिंद्र शार्दुल, विलास जाधव, मनोहर कोकाटे, संदीप बर्डे ,श्री सचिन, संजय परदेशी, विजय सूर्यवंशी, देविदास शार्दुल प्रकाश आरणे अदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडे यांनी केले तर आभार अक्षय जाधव यांनी मानले.