आजच्या स्पर्धेतील युगाचा विचार करता आपल्या जवळके जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ही वाखण्याजोगी – माजी सरपंच बंडूभाऊ थोरात
वीरभद्र यात्रा कमिटीचा आदर्श उपक्रम


आजच्या स्पर्धेतील युगाचा विचार करता आपल्या जवळके जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ही वाखण्याजोगी – माजी सरपंच बंडूभाऊ थोरात
आजच्या स्पर्धेतील युगाचा विचार करता आपल्या जवळके जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता ही वाखण्याजोगी – माजी सरपंच बंडूभाऊ थोरात
वीरभद्र यात्रा कमिटीचा आदर्श उपक्रम
कोपरगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण कोपरगाव तालुक्यात जवळके गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा एक वेगळाच ठसा असल्याचे प्रतिपादन गावचे माजी सरपंच तथा शिक्षणप्रेमी बंडोपंत थोरात यांनी ग्रामस्थांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
सविस्तर वृत्ताचे की जवळके येथील श्री वीरभद्र यात्रा उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व असून याच यात्रा कमिटीच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप गावचे माजी सरपंच बंडूभाऊ थोरात, उपसरपंच सुनिल थोरात,बाबासाहेब थोरात, नानासाहेब थोरात , परसराम शिंदे ,रावसाहेब आण्णा थोरात,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप थोरात आदी मान्यवर व ग्रामस्थ तसेच शिक्षक शिक्षिका यांच्या शुभहस्ते शनिवार ५ एप्रिल रोजी करण्यात आले.
याप्रसंगी माजी सरपंच थोरात यांनी पुढे बोलताना सांगितले की, आजच्या स्पर्धेतील युगाचा विचार करता आपल्या शाळेची गुणवत्ता ही वाखण्याजोगी असून आपले विद्यार्थी शासनाच्या वेगवेगळ्या परीक्षेत यशस्वी होत असतात त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा विचार करता आपल्या शाळेने उत्कृष्ट शिक्षणाच्या बाबतीत एक वेगळा ठसा उमटवत नावलौकिक मिळवला असून यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक हे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असल्याने हे सर्व शक्य होत असल्याचे सांगत ग्रामस्थांच्या वतीने सर्व शिक्षकांचे अभिनंदन करून वीरभद्र यात्रा कमिटीच्या वतीने राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक माजी सरपंच बंडूभाऊ थोरात यांनी केले.
