ब्रेकिंग
प्रियंका गांधी यांच्या सभेच्या तयारीची आमदार थोरात यांनी केली पाहणी
शिर्डी येथे जय्यत तयारी सुरू

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या प्रियंका गांधी या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच येत असून शनिवार 16 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सभेची जय्यत तयारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू असून या तयारीची पाहणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी या शनिवारी शिर्डी येथे प्रचार सभेसाठी येणार आहेत. यावेळी सकाळी 10 वा. त्या साईबाबा मंदिर येथे दर्शन घेणार असून त्यानंतर 10.30 वा. नगर मनमाड हायवे साकुरी येथील दौलतबाग येथे सौ.प्रभावती ताई घोगरे व महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहे.

या सभेसाठी भव्य व्यासपीठ तयार करण्यात आले असून जर्मन हँगर पद्धतीचा मंडप उभारण्यात आला आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, पार्किंग व विविध कक्ष करण्यात आले आहे. या सर्व तयारीची पाहणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, शिर्डी लोकसभेच्या निरीक्षक राजस्थानच्या आमदार रिटा चौधरी, सहप्रभारी बी.एम. संदीप, ॲड.नारायणराव कारले, शिर्डीचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, काँग्रेसचे सचिव सचिन गुंजाळ, आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.या सभेसाठी उत्तर अहमदनगर जिल्ह्यातून नागरिक व महिला मोठ्या संख्येने येणार असून यावेळी जिल्ह्यातील सर्व काँग्रेसचे पदाधिकारी याचबरोबर महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व राज्यातील पदाधिकारी ही उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेसाठी शिर्डी, श्रीरामपूर ,कोपरगाव,संगमनेर, अकोले,पारनेर,नेवासा, अहमदनगर, राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक व युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.