ना.थोरात यांच्या पाठपुराव्यातून वरवंडीसह ६ गावांसाठीच्या पाणी पुरवठा योजनेला 32 कोटी 87 लाख रूपये मंजूर
ना.थोरात यांच्या पाठपुराव्यातून वरवंडीसह ६ गावांसाठीच्या पाणी पुरवठा योजनेला 32 कोटी 87 लाख रूपये मंजूर
संगमनेर ( विनोद जवरे )
राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या सततच्या सहकार्यातून पठार भागातील वरवंडी, खांबे, खरशिंदे, चौधरवाडी, कुंभारवाडी,दरेवाडी व कौठे मलकापूर या गावांकरिता जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 32 कोटी 87 लाख 30 हजार रुपये मंजूर झाला असल्याची माहिती जि.प महिला बालकल्याण विभागाच्या सभापती सौ.मिराताई शेटे यांनी दिली आहेत.
याबाबत अधिक माहिती देतांना सौ. मिराताई शेटे म्हणाल्या की, विधीमंडळ नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाच्या संकटानंतर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महाराष्ट्र सरकार मधून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला असून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावातील वाडी वस्तीच्या विकासाकरता अनेक योजना राबवल्या आहेत. विविध गावांकरीता एकत्रित पाणीपुरवठा योजना मंजूर करून त्या गावांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळेल यासाठी प्रयत्न केले आहे. ना.थोरात व आ.डॉ.तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पठार भागातील प्रत्येक गावात अनेक विकास कामे सुरु आहेत. नुकतेच महाराष्ट्र सरकारकडून जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत पठार भागातील वरवंडी, खांबे, खरशिंदे, चौधरवाडी, कुंभारवाडी,दरेवाडी व कौठे मलकापूर या गावांकरिता जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 32 कोटी 87 लाख 30 हजार रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे या सर्व गावांना शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे. हा भरीव निधी मिळाल्याबद्दल महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात,आ.डॉ,सुधीर तांबे, इंद्रजितभाऊ थोरात, सौ.मिराताई शेटे, शंकर पा.खेमनर, पं.स सदस्य किरण मिंडे, सौ.संगिता कुदनर यांचे पठार भागातील वरवंडी, खांबे, खरशिंदे, चौधरवाडी,कुंभारवाडी,दरेवाडी व कौठे मलकापूर गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळ, कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.