जवळके येथील के बी रोहमारे महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
जवळके येथील के बी रोहमारे महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील के. बी. रोहमारे महाविद्यालयात इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व वार्षिक बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक आण्णा रोहमारे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगांव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव व संस्थेच्या संचालक संदिप रोहमारे हे उपस्थित होते.कार्यक्रमांची सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दिपप्रज्वलनाने सुरुवात झाली या प्रसंगी स्वागतगीत विद्यालयाच्या इयत्ता११ वी मधील विद्यार्थीनीं सादर केले.इयत्ता १२ वी विद्यार्थिनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यालयाच्या प्रती असलेले सुखद अनुभव व्यक्त केलेत तर काही विद्यार्थी भावनाविवश झालेत, या प्रसंगी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डी. आर. सोनवणे यांनी वर्षभराचा लेखा-जोखा प्रास्ताविकेतून प्रकट केला सन २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, विविध कला स्पर्धा, पार पडल्या होत्या,ह्या स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले होते अश्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी बक्षिस समारंभाचे आयोजन केले होते तर इयत्ता बारावी मध्ये प्रथम क्रमांक पटकवलेल्या विद्यार्थ्याचा देखील गौरव या प्रसंगीं करण्यात आला.विद्यार्थी आपले दैवत असून तो केंद्रबिंदू ठेऊनच आपण त्याच्या सर्वांगीण विकास साधला पाहिजे” असे प्रतिपादन अध्यक्ष यांनी केले.विद्यार्थ्यांच्या भावना ऐकून आपण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आपण सर्वतोपरीप्रयत्न करणार आहोत असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.यावेळी व्यासपीठावर जवळके गावचे विद्यमान सरपंच बाबुराव थोरात तसेच महाविद्यालयाचे संचालक लक्ष्मण दादा थोरात उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.सूत्रसंचालन साबळे सर व पोकळे मँडम यांनी केले तर आभार रहाणे सर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या शिक्षकांचे व यशस्वी विद्यार्थांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष अशोक आण्णा रोहमारे यांनी केले आहे.