इंद्रजीत भाऊ थोरात यांना मातृशोक
कमलताई पंडितराव थोरात यांचे अल्पशा आजाराने निधन
संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांची चुलती आणि थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांच्या मातोश्री कमलताई पंडितराव थोरात यांचे आज अल्पशा आजाराने औरंगाबाद येथे निधन झाले. स्वर्गीय सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व स्वर्गीय मथुराबाई थोरात यांच्या सहवासात कुटुंबात पंडितराव तात्या थोरात यांच्या बरोबरीने शेती आणि उद्योग व्यवसायात श्रीमती कमलताई यांनी योगदान दिले. पुतणे काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, मुलगा इंद्रजीत भाऊ थोरात, रणजीत थोरात , दोन मुली असा त्यांचा मोठा परिवार आहे. धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाच्या असलेल्या श्रीमती कमल ताई यांना सर्व ताई या नावाने परिचित होत्या. अत्यंत उत्कृष्ट शेती करताना मुले सुना नातवंडे यांना संस्कार त्यांनी दिले. वयाच्या अखेरपर्यंत वाचनाचा छंद त्यांनी जपला. त्यांच्या पश्चात मुलगा इंद्रजीत रणजीत व दोन मुली यांसह पुतणे आमदार बाळासाहेब थोरात तीन पुतण्या सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने जोर्वे गावासह संगमनेर तालुक्यात मोठी शोककळा पसरली आहे.
थोरात परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले – आमदार थोरात
बाईंच्या बरोबरीने ताईंनी आम्हा सर्व भावंडांवर संस्कार केले. अत्यंत शिस्तबद्ध आणि धार्मिक वृत्तीच्या असलेल्या ताईंच्या निधनाने आमच्या परिवारातील सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली आहेत.