आजपासून जवळके येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरूवात
सप्ताह कालावधीत राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा
आज पासून जवळके येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरूवात
सप्ताह कालावधीत राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा
कोपरगांव । विनोद जवरे ।
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की सालाबादप्रमाणे याही वर्षी आनंद कोटी ब्रम्हांडनायक पंढरी पांडुरंगाच्या कृपेने, योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य श्रीपाद महाराज माऊली यांच्या आशीर्वादाने तसेच महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ जवळके यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सोमवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी सप्ताह सोहळ्यास प्रारंभ होत आहे या सप्ताहात कालावधी दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आलेले आहे.
या काळात राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा सप्ताह कालावधीत संपन्न होणार आहे यामध्ये 21 ऑगस्ट रोजी ह.भ.प. दर्शन महाराज कबाडी ( जुन्नर ) ,22 ऑगस्ट रोजी ह.भ.प. लक्ष्मण महाराज चौगुले ( राहुरी )
23 ऑगस्ट रोजी ह.भ.प. रोहित महाराज पांचाळ ( देवाची आळंदी ) 24 ऑगस्ट रोजी ह.भ.प.हेमलताताई पिंगळे ( वेलगांव ) 25 ऑगस्ट रोजी ह.भ.प. कविराज महाराज झावरे ( पारनेर ) 26 ऑगस्ट रोजी ह.भ.प. अमोल महाराज बडाख ( बाभळेश्वर ) 27 ऑगस्ट रोजी ह.भ.प. अमोल महाराज गाडे ( सरला बेट ) 28 ऑगस्ट रोजी ह.भ.प. व्यंकटेश महाराज सोनवणे यांचे सकाळी 10 ते 12 कालावधीत काल्याचे किर्तन तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी जवळके ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.