मेजर रामदास बढे यांचे गावात स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील

मेजर रामदास बढे यांचे गावात स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
मेजर रामदास बढे यांचे गावात स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर । प्रतिनिधी । मेजर रामदास बढे यांचे बलिदान भारत मातेच्या चरणी समर्पित झाले आहे. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी गावात स्मारक उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. बढे यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी कोणत्याही अडचणी आल्यास मला सांगाव्यात माझे सहकार्य तुम्हाला मिळेल अशा शब्दात त्यांनी दिलासा दिला.
मंत्री विखे पाटील यांनी आज मेंढवण येथे येवून शहीद जवान रामदास बढे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. बढे कुटूंबियांची त्यांनी भेट घेवून त्यांचे सात्वन करुन दिलासा दिला. सैन्य दलामध्ये रामदास बढे यांनी केलेल्या कार्याची माहीती जाणून घेतली. याप्रसंगी ग्रामस्थांनी रामदास बढे यांचे स्मारक उभारणी बाबतचा विषय मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला.

शहीद जवानांचे स्मारक होणे हे आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी बाब आहे. राजुरी येथे शहीद जवान गोरे यांचे स्मारक ग्रामस्थांनी पुढाकार घेवून चांगल्या पध्दतीने उभारले आहे. त्याच पध्दतीचे स्मारक या गावात रामदास बढे यांचे व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन स्मारकासाठी चांगली जागा पाहा, जागेसाठी काही प्रश्न असतील तर तातडीने आ.अमोल खताळ आणि तहसिलदार धिरज मांजरे यांनी एकत्रित बसून मार्ग काढण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

मंत्री विखे पाटील यांनी बढे यांच्या मुलांची शिक्षणाबाबत चौकशी करुन माहीती घेतली. भविष्यात कुठलीही अडचण आली तरी, माझ्याशी थेट संपर्क करा, तुम्हाला माझे नेहमीच सहकार्य राहील अशा शब्दात त्यांनी या कुटूबियांना दिलासा दिला.