ब्रेकिंग

संगमनेरच्या जनतेची सेवा करण्यासाठी साईबाबांनी शक्ती द्यावी – आमदार अमोल खताळ

निळवंडेचे पाणी सुध्दा ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिळू शकले - खताळ

संगमनेरच्या जनतेची सेवा करण्यासाठी साईबाबांनी शक्ती द्यावी – आमदार अमोल खताळ

निळवंडेचे पाणी सुध्दा ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिळू शकले – खताळ

शिर्डी  । प्रतिनिधी ।

इकडे येवून दहशतीवर खोटी भाषण करणार्यांना संगमनेरच्या जनतेन घरी बसवून तालुका भयमुक्त करून दाखवला आता तालुका टॅकरमुक्त करून दाखवायचा असल्याचे प्रतिपादन आ.अमोल खताळ यांनी केले.आ.अमोल खताळ यांनी सपत्नीक साईसमाधीचे दर्शन घेतले.महायुतीच्या वतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला.माध्यमांशी बोलतांना आ.खताळ यांनी पुन्हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यानी निर्माण केलेल्या दहशतीवर टिका केली.इकडे येवून दहशतीवर खोटी भाषण करीत होते.परंतू त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तालुक्यात अनेक वर्ष दहशत निर्माण केली जात होती.यावर्षीच्या निवडणूक तालुका दहशतमुक्त करण्याचा आणि परीवर्तन करण्याचा नारा दिला होता.त्यास संगमनेर तालुक्यातील जनतेन साथ देत परीवर्तन करण्याचा निर्धार कृतीत उतरवला असल्याचे आ.खताळ म्हणाले.

त्यांचे चाळीस वर्षे फक्त दहशत निर्माण करण्यात गेली पण ते जनतेला पाणी देवू शकले नाही.आजही तळेगाव निमोण आणि साकूर पठार भाग तहानलेला आहे.निळवंडेचे पाणी सुध्दा ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे मिळू शकले असेही त्यांनी सांगितले.तालुक्यातील जनतेला पाणी द्यायचे हाच आपला प्रयत्न असून भयमुक्त तालुका करतानाच टॅकरमुक्त तालुका करण्याचा आपला प्रयत्न असेल.वर्षानुवर्ष महीलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचा संकल्प आपला असून युवकांना रोजगार निर्माण करून देणे आणि आरोग्याच्या सुविधा भक्कम करण्याचे प्राधान्य आपले असेल आशी ग्वाही त्यांनी दिली.संगमनेरच्या जनतेची सेवा करण्यासाठी साईबाबांनी शक्ती द्यावी आशी प्रार्थना आपण केली असून तालुक्यातील मायबाप जनतेन भरभरून मतदान करून विधानसभेत पाठवले आहे.त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे आ.खताळ यांनी सांगितले.याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार युवा मोर्चाचे उपाध्यक्ष किरण बोराडे जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर नवनाथ मंजमुळे शहराचे अध्यक्ष विकास गोंदकर संगमनेरचे अध्यक्ष शशांक नामन सुयोग गोंदकर राजेंद्र बलसाने प्रसाद शेलार योगेश बडे राहूल घुले महेश सुपेकर रोहीदास गुंजाळ संदेश देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!