बाळासाहेब थोरात माझे अभ्यासू सहकारी – पृथ्वीराज चव्हाण.

बाळासाहेब थोरात माझे अभ्यासू सहकारी – पृथ्वीराज चव्हाण.
बाळासाहेब थोरात माझे अभ्यासू सहकारी – पृथ्वीराज चव्हाण.
संगमनेर । विनोद जवरे ।
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्याच क्षणापासून मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागेल याची चर्चा सुरु झाली होती.. सर्वांचे लक्ष महत्वाच्या खात्यांकडे होते. नामदार बाळासाहेब थोरात यांचा मंत्री मंडळात समावेश असणार याच्याबद्दल कुणाच्याही मनात शंका नव्हती. अशातच सर्वत्र ब्रेकिंग न्यूज सुरु झाली महसूलमंत्रीपदी बाळासाहेब थोरात. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून त्या क्षणापासूनच साहेबांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. महसूल खाते हे मंत्रीमंडळातील दुसरे महत्वाचे खाते म्हणून ओळखले जाते आणि आता ही जबाबदारी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेकडे आली होती. ही बाब सर्वांचे स्फुरण वाढवणारी होती. त्यांनी खात्याचा कार्यभार पाहतांना नामदार थोरात यांनी अत्ंयत अभ्यासपुर्व काम केल्याचे दिसून येते. नामदार थोरात हे मुळातच वकील असल्याने त्यांना कायद्याचे ज्ञान आहे. ही देखील त्यांच्या जमेची महत्वाची बाजू आहे. तात्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी लोकनेते थोरात यांनी सातत्याने पावलो पावली प्रयत्न केला.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा व आमच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी यांच्या आदेशाने महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे काम करण्याची जबाबदारी जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा ुनिश्चीतच मंत्रीमंडळाची रचना कशी असावी, आगामी काळात मला यांची मदत लागणार अशा सहकारी मित्रांची नावे डोळ्याांसमोर येवू लागली. यामध्ये आमचे सहकारी बाळासाहेब थोरात यांचे नाव प्राधान्याने डोळ्याासमोर आले. विशेषत: सहकारी चळवळीतून या महाराष्ट्राची जडण – घडण झाली आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारी चळवळीत महत्वाचे काम केले. संस्था चिकाटीने व पारदर्शकपणे कशा चालवाव्या याचे उदाहरण त्यांनी समाजाला घालून दिले आहे. संस्था चालविताना केवळ नफा हा उद्देश न ठेवता सर्वसामान्यांचा फायदा व्हावा या उद्देशाने दादांनी काम केले. पुढे तेच काम आमचे मित्र बाळासाहेब थोरात यांनी चालू ठेवले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात काम करत असतांना आम्ही सातत्याने सोबत होतो. अनेक विषयांत आमची चर्चा होते. अनेक वेळा रायस्तरीय निर्णय घेतांना बाळासाहेबांचे विचार लाखमोलाचे ठरले. अनेक जबाबदार्या पार पाडत असतांना त्यांच्यात नेहमीच उत्साह असतो. अनेक वेळी कटू निर्णय घेण्याचा प्रसंग आला. यावेळी यातून मार्ग काढण्याची त्यांची सहजताहजी मला भावली. लोकांना काय हवे त्यांना सहजच लक्षात येते. महसूलमंत्री पदासारखे अनेक महत्वाची खाती त्यांनी समर्थपणे सांभाळली व प्रत्येक खात्याला न्याय दिला. बाळासाहेब थोरात यांची काम करण्याची पद्धत ही वाखाणण्यासारखी आहे. मला त्यांचा स्वभाव विशेष आवडतो. काम करुन घेण्याची त्यांची एक पद्धत आहे. कोणतेही निर्णय घेतांना ते जनतेचे हीत लक्षात घेतात व यालाच आदर्श राजकारणी व समाजकारणी म्हणतात. तरुण,तडफदार,शांत व सर्वांच्या विचारांना प्राधान्य देणार्या व्यक्तींची समाजाला गरज आहे. बाळासाहेब थोरात यांचेकडे या सर्व गोष्टी असल्याने ते सर्वांत उठून दिसतात. पुन्हा एकदा लोकनेते बाळासाहेब थोरात यांना पुढील कार्यास शुभेच्छा !
पृथ्वीराज चव्हाण.
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य .