ब्रेकिंग

हृदय फीट तर लाईफ हिट ! ; एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये महाहृदय उपचार शिबीर

सात वर्षात २३ हजार ४८९ रुग्णांवर यशस्वी हृदय उपचार

हृदय फीट तर लाईफ हिट ! ; एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये महाहृदय उपचार शिबीर


 संगमनेर । विनोद जवरे ।

दिवसेंदिवस वाढलेल्या हृदयविकारांना आळा बसावा यासाठी येत्या बुधवार आणि गुरुवारी भव्य हृदयउपचार व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर दिनांक 12 आणि १३ एप्रिल म्हणजेच येत्या बुधवार आणि गुरुवारी एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. हृदय विकाराचे निदान करण्यासाठी आवश्यक असलेल्या २ डी इको तपासणी अवघ्या ५०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आली असून अँजिओग्राफी पूर्णपणे मोफत केली जाईल. तसेच एसएमबीटी हॉस्पिटलमधील नामवंत हृदयविकार तज्ञ या शिबिरात रुग्णांची तपासणी करतील. जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिरात सहभागी होऊन तपासणी  करून घ्यावी असे आवाहन एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.छातीत दुखणे, जळजळ होणे, चालताना जास्तीचा दम लागणे, दरदरून घाम येणे, डाव्या बाजूच्या जबड्याला वेदना होणे, छातीवर भार वाटणे तसेच डाव्या हाताला सतत मुंग्या येणे किंवा वेदना होणे अशी लक्षणे असल्यास अशा रुग्णांसाठी हे आरोग्य शिबीर महत्वाचे ठरणार आहे. सर्वोत्कृष्ट आरोग्यविषयक उपचार मिळावेत यासाठी एसएमबीटी हॉस्पिटलने कायमच पुढाकार घेतले आहेत.

भारतात दरवर्षी हृदयरोगाने ग्रस्त असलेली हजारो बालके जन्मतात. तर मधुमेह झालेल्या ३५ ते ४० टक्के रुग्णांना हृदयविकाराचा त्रास होतो. एसएमबीटी हॉस्पिटलने रुग्णांची ही गरज ओळखून स्वतंत्र हृदयरोग विभाग कार्यन्वित आहे. जेथे हृदयरोग निव्वळ बरा केला जात नाही; तर तो पुन्हा होऊच नये,  यासाठीही काळजी घेतली जाते. पुर्वी हृदयरोगाच्या योग्य उपचारांसाठी मोठ्या शहरांत जावे लागायचे. एसएमबीटी हॉस्पिटलमधील अद्यायवत सोयीसुविधा यामुळे आता राज्यभरातील विविध शहरांमधील रुग्ण हे हृदय विकारांवरील उपचारांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येत आहेत.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दररोज रुग्णांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीची करण्यात येते. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, ठाणे पालघर पर्यंतच्या तसेच राज्यभरातील रुग्णांना या सुविधांचा लाभ घेणे शक्य झाले आहे. हृदयरुग्णांची काळजी घेण्यासाठी अनुभवी व तज्ज्ञ हृदयरोगतज्ज्ञ आणि त्यांची टीम २४ तास कार्यरत आहे. या शिवाय हृदयरोगावरील शस्त्रक्रिया या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हॉस्पिटलमध्ये पुर्णत: मोफत असल्याने त्याचाही लाभ रूग्णांना होतो आहे. तेव्हा जास्तीत जास्त रुग्णांनी एसएमबीटी हॉस्पिटल धामणगाव येथे आयोजित शिबिरात सहभागी होऊन उपचार करून घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

एसएमबीटी हार्ट इन्सिट्यूट

एसएमबीटी हार्ट इन्सिट्यूटमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास या शस्त्रक्रिया मोफत असून बाह्यरुग्ण तपासणी देखील मोफत आहे. येथे बालहृदयरोग शस्त्रक्रियेत हृदयरोगासंबंधी सर्व प्रकारचे जन्मजात हृदयविकार, बलून शस्त्रक्रिया, हृदयाच्या झडपांची शस्त्रक्रिया, हृदयाचा वाल्व बदलणे अथवा तो दुरूस्त करणे या हृदयविकारावरील शस्त्रक्रियादेखील पूर्णपणे मोफत केल्या जातात.

 

शिबिराचे फायदे

· मोफत अँजिओग्राफी

· २ डी इको अवघ्या ५०० रुपयांत

· हृदयविकार तज्ञांचा सल्ला


हॉस्पिटलची वैशिष्ट्ये

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये १००० बेडचा आंतररुग्ण विभाग, १०० आयसीयू बेड, १७ मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक कॅथलॅब, १० एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड, २४ तास डायलिसिस सुविधा, २४ तास औषधालय सेवा, रुग्णांसाठी जेवणाची सुविधा मोफत, रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची, जेवणाची सोय, टूडी इको कार्डिओग्राफी, कार्डियाक स्ट्रेस टेस्ट, कलर डॉपलर, अत्याधुनिक रेडिओलॉजी विभाग, डायलिसिस, आधुनिक सीटी-स्कॅन व एक्स-रे, २४ तास रुग्णवाहिका, २४ तास रक्तपेढी खुली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!