ब्रेकिंग
भारतीय घटनेला धक्का म्हणजे लोकशाहीवर आक्रमण – खा. मुकुल वासनिक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जातीच्या राज्यस्तरीय दोन दिवशीय शिबिराला शिर्डीत सुरुवात
भारतीय घटनेला धक्का म्हणजे लोकशाहीवर आक्रमण – खा. मुकुल वासनिक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जातीच्या राज्यस्तरीय दोन दिवशीय शिबिराला शिर्डीत सुरुवात
कोपरगांव । विनोद जवरे ।
भाजप सरकार सत्तेत आल्या पासून सतत घटना विरोधी कृत्य करत आहे. भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाही मूल्य दिलेली असतांना मानवी मूल्य तुडविली जात आहेत, स्वातंत्र्यचा गळा घोटण्याचं काम इथे होतं आहे याचे मोठे उदाहरणं म्हणजे मणिपूरमध्ये चालू असलेला नर संहार. आज मणिपूर वर लोकशाही चे मंदिर असलेल्या पार्लमेंट मध्ये मणिपूर विषयावर बोलू दिलं जात नाही.350 हुन अधिक चर्च मणिपूर जाळलंय तसेच 2-3 मंदिर उध्वस्त केली गेली मात्र, त्यावर अजूनही प्रधानमंत्री मोदी यांनी त्यावर तोडगा काढला नाही. एकप्रकारे हा देश धोक्यात आला आहे असे सांगून मुकुल वासनिक यांनी भारतीय घटना शाबूत ठेवण्या साठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत लढा चालूच ठेवेल संपूर्ण भारतीयांनी काँग्रेस विचार धारा जोपसावी असे आवाहन करत भारतीय घटना तयार करतांना मसुदा समितीच्या झालेल्या सभा, त्यांचे अध्यक्ष व तारखाचा अभ्यासपूर्ण उल्लेख केला. संविधान कि राह पर या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करून आयोजक सिद्धार्थ हत्तीअभीरे यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली प्रत्येक ठिकाणी असा कार्यकर्ता तयार व्हावा अशीच अपेक्षा खा. वासनिक यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुशांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली.

निळा झेंडा आणि जयभीम चा नारा आता काँग्रेसनेही स्वीकारावा – राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया
समस्त उपेक्षित, वंचित जनतेच्या जीवनाचे शिल्पकार ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ बसपा किंवा इतर रिपब्लिकन पक्षाचे नसून काँग्रेस चे ही बाबासाहेब आंबेडकर आहेत हे दाखवायचे असेल तर आता काँग्रेसनेही ” निळा झेंडा स्वीकारून जयभिमचा नारा द्यावा ” अशी आग्रही मागणी काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया यांनी केली. उपेक्षित, वंचित समाज आपल्या पासून दूर का गेला यांचा विचार काँग्रेस ने ही करावा असे सांगून काँग्रेस संघटन आणि उपेक्षित वंचित समाजात कुठे तरी गॅप पडला तो भरून काढावा कारण देशातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी आणि अल्पसंख्यांक हे काँग्रेस पक्षाचे मुख्य मतदार आहेत ते कायम पक्षा सोबत राहिले पाहिजे असा आशावाद लिलोठीया यांनी व्यक्त केला. सिद्धार्थ हत्तीअंभीरे यांचे कार्यविषयीं बोलतांना राहुल गांधी यांनी सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेतली असून देशात सर्वात चांगले काम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंभीरे यांचे आहे त्यांनीच पहिल्यांदा परभणी ते दिक्षाभूमी अशी पाई धम्म यात्रा काढली याबद्दल अभिनंदन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे आयोजक सिद्धार्थ हत्ती अंभीरे यांनी केले अनुसूचित जातीच्या प्रश्नावर आम्ही राज्यभर रस्त्यावर उतरू असे सांगून अनुसूचित जातीच्या योजना प्रभावी रित्या अमलबजावणी झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली. सुरुवातीला खा. मुकुल वासनिक आणि राजेश लिलोठीया यांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंभीरे केले. संचलन पवनकुमार डोंगरे यांनी केले कार्यक्रमला आ. लहू कानडे, माजी आमदार विजय खडसे, राजेश लाडे, ऍड. विजय साळवे, अश्विनी खोब्रागडे, संजय भोसले, बंटी यादव, गौतम गवई, सुजित यादव, प्रवीण सुरवाडे, कृष्णा भंडारे सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी महात्मा गांधी यांना अभिवादन करून रॅली काढण्यात आली

