पैसा झाला मोठा…भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वे गावात ग्रामसभेत राडा….
मागावर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह...

पैसा झाला मोठा…भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वे गावात ग्रामसभेत राडा….

पैसा झाला मोठा…भ्रष्टाचार लपविण्यासाठी जोर्वे गावात ग्रामसभेत राडा….
मागावर्गीयांच्या निधीवरही प्रश्नचिन्ह…
आरोपांच्या फेरीत जोर्वे ग्रामसभा गाजली

जोर्वे येथे ग्रामसभा होती, परंतु ती ग्रामसभा गाजली काही विशिष्ट कारणांनी सामान्य जनता आपल्या कष्टाचा पैसा कर स्वरूपात सरकारला देत असते, व त्यातीलच काही निधी सरकार ग्रामपंचायतीला गावाच्या विकासासाठी देत असते, आज जोर्वे गावात गेली अडीच वर्ष या निधीचा संपूर्णपणे गैरवापर होत असल्याने, जाब विचारण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र आले होते , परंतु सरपंचांकडे याचे उत्तरच नसल्याने सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारांना विचारणाऱ्यांनाच दम देणे ,धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू झाले ,एकीकडे पंचक्रोशीत सांगायचे आम्ही विकास कामांची डोंगर उभे करत आहोत, परंतु त्याच वेळेस जेव्हा एक एक करून अनेक घोटाळे बाहेर निघायला सुरुवात झाली, त्यावेळेस मात्र ते हमरीतुमरीवर आले.


हे ऐकून सर्वच जनता अवाक, झाली.जोर्वे गावात गेली 40 वर्ष जे कधीही घडले नाही, असा प्रकार आज घडत होता, शिव्या , भांडणे मारामाऱ्यानी संपूर्ण गाव हादरून गेले, युवा पिढी थोड्याशा प्रलोभनांना बळी पडून असे वागत असेल, तर भविष्य अवघड आहे, असे गावातील ज्येष्ठ मंडळींनी बोलून दाखवले. यावेळी सुरेश थोरात,सत्यजित थोरात हर्षल काकड, उपसरपंच बादशहा बोरकर,संजय थोरात, संपत थोरात, मुकेश काकड, राहुल बोरकर,भाऊसाहेब दिघे, बालम भवर, माणिकराव यादव, राजू थोरात, रमेश दिघे, अक्षय दिघे, विठ्ठल काकड, पंढरीनाथ बलसाने, गगन थोरात, डॉ. पवन काकड, अजित थोरात, शुभम दिघे, शांताराम दिघे, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, कैलास क्षीरसागर,जीवन काकड, ऋषिकेश थोरात, बाळासाहेब काकड, संदीप यादव,दत्तू नाना काकड.शुभम दिघे, व इतर ग्रामस्थ यांनी अनेक प्रश्नांचा भडीमार केला सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने त्यांनी गोंधळ घातला