लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून चंदनापुरी,धांदरफळ बु. व निमगाव बु. येथे अद्यावत वाचनालय
प्रत्येक अद्यावत वाचनालयासाठी 30 लाख रुपयांचा निधी – डॉ.जयश्रीताई थोरात
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून चंदनापुरी,धांदरफळ बु. व निमगाव बु. येथे अद्यावत वाचनालय

प्रत्येक अद्यावत वाचनालयासाठी 30 लाख रुपयांचा निधी – डॉ.जयश्रीताई थोरात
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात चंदनापुरी,निमगाव बुद्रुक व धांदरफळ बुद्रुक येथील अद्यावत अभ्यासिकांची भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, रामहरी कातोरे, अनिलराव देशमुख, विजय राहणे, शांताराम कढणे, चंदनापुरीचे सरपंच भाऊराव रहाणे,उपसरपंच सौ.हौशाबाई कढणे, हर्षल राहणे,रोहिदास राहणे, धांदरफळ सरपंच सौ.उज्वला देशमाने, सतीश खताळ, मनीष गोपाळे,भास्कर गोपाळे, कारभारी शेळके, माधवराव कानवडे, सरपंच सोमनाथ, सचिन कानवडे,राजेंद्र कानवडे,भाऊसाहेब फरगडे,राजेंद्र मोरे आदींसह गावातील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावात विकासाच्या मूलभूत योजना राबवल्या आहेत. ग्रामीण विकासातून संगमनेर तालुका राज्यात अग्रगण्य बनवला आहे. याचबरोबर तरुणांसाठी सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले असून त्यांच्या कलागुणांना वाव दिला आहे. संगमनेर हे आता गुणवत्तेचे शैक्षणिक केंद्र निर्माण झाले असून ग्रामीण विद्यार्थ्यांना वाचनालय व आधुनिक अभ्यासिका निर्माण व्हावी याकरता 12 अभ्यासिका मंजूर केल्या आहेत. या प्रत्येक अभ्यासिका 30 लाख रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणार आहेत.या अभ्यासिकांमधून तरुणांना वाचनाची मोठी संधी निर्माण होणार आहे. आणि या माध्यमातून आदर्श व समृद्ध तरुण पिढी निर्माण होणार आहे.संगमनेर मध्ये सध्या सुरू झालेल्या विविध आमली पदार्थांची तस्करी ही तरुण पिढीसाठी अत्यंत भयावह असून याबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सातत्याने पालकांना जागरूक राहण्याची आव्हान केले असून आपली तरुण पिढी वाचवण्यासाठी त्यांना वाचनाची सवय लावणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

तर रामहरी कातोरे म्हणाले की, लोकनेता नेहमी समाजाच्या सर्वांग प्रगतीचा विचार करत असतो. आणि ते काम कायम बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. सर्व समाजाला बरोबर घेऊन सर्वांच्या विकासासाठी काम करणाऱ्या या नेतृत्वाने प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या. याचबरोबर संगमनेर तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी निळवंडे धरण व कालव्यांची निर्मिती केली. संगमनेर शहरांमध्ये थेट पाईप लाईन योजनेसह पायाभूत विकासाच्या सुविधा राबवल्या. संगमनेर शांत व वैभवशाली बनवण्याचे काम त्यांनी केले असून सध्या मात्र मागील एक वर्षापासून संगमनेर तालुका अस्वस्थ व असुरक्षित झाला असून पुन्हा तालुक्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी तरुणांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या विचारांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी हर्षल राहणे म्हणाले की, युवकांना वाचनाची सवय लावण्याचे काम लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून होत आहे. मात्र काही लोक युवकांना अमली पदार्थांची सवय लावण्याचे काम करत असल्याचे टीका त्यांनी केली. यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी गावातील युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



