भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
असे व्हिडीओ प्रसारित केल्यास संबंधीत प्रसार माध्यमांचे ग्रुप अॅडमीन यांचेवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पिडीत महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल
कोपरगांव । प्रतिनिधी । कॅप्टन अशोक खरात याने जादु टोणा, भोंदुगिरी करुन महिलांवर लैंगिक अत्याचार केले प्रकरणी गुन्हे दाखल असुन त्या गुन्ह्यातील पिडीत महिलांचे अश्लील व्हिडीओ BMW या व्हॉटस्अप ग्रुपवर प्रसारीत केले असल्याचे दिसुन आले आहे.
असे व्हिडीओ प्रसारित केल्यास संबंधीत प्रसार माध्यमांचे ग्रुप अॅडमीन यांचेवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल
सदर बाबत कोपरगाव शहर, पोलीस स्टेशन येथे गु.रजि नंबर १४७/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९४ (२), ३ (५) सह माहीती तंत्रज्ञान कायदा २००० चे कलम ६७ (अ) प्रमाणे दिनांक २५/०३/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात १) राहुल गंगाधर शिंदे रा.शिवाजीरोड, कोपरगाव जि. अहिल्यानगर २) योगेश पढरीनाथ आढाव वय ५० वर्षे रा. मोहीनीराजनगर कोपरगाव ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर यांना अटक करण्यात आलेली आहे. आरोपी क्र.३ संदिप गर्ज रा.मांजलगाव जि.बीड याचा शोध सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदरचे प्रकरण हे संवेदनशील व गंभीर असल्याने अतिशय गोपनीयरित्या महिलांची ओळख उघड होणार नाही याची खबरदारी घेवुन तपास यंत्रणा काम करीत आहे.तरी याव्दारे सर्वांना आवाहान करण्यात येते की, कोणाकडेही पिडीत महिलेची ओळख त्यांच्या नातेवाईकांची ओळख, त्यांच्या घराची ओळख, त्यांच्या कुटुंबियाची ओळख उघड होईल असे व्हिडीओ किंवा अश्लिल व्हिडीओ असल्यास ते तात्काळ डिलीट करावे व ते प्रसार माध्यामांवर प्रसारीत करु नये. असे व्हिडीओ प्रसारित केल्यास संबंधीतावर व संबंधीत प्रसार माध्यमांचे ग्रुप अॅडमीन यांचेवर गुन्हा दाखल करुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल.