ब्रेकिंग

लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयाचा कायापालट!

त्रिशताब्दी वर्षात विद्येचे मंदीर नव्या स्वरूपात सज्ज!

लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यालयाचा कायापालट!

जाहिरात

त्रिशताब्दी वर्षात विद्येचे मंदीर नव्या स्वरूपात सज्ज!

लोणी । प्रतिनिधी । स्त्रीशक्तीचे प्रतीक आणि आदर्श राज्यकर्त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, त्यांच्या नावाने कार्यरत असलेले प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आता एका नवीन आणि आधुनिक स्वरूपात ज्ञान दानासाठी सज्ज झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा कृतीतून पुढे नेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची संधी निर्माण करून देण्यात आली आहे.अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त या शाळेचा केवळ भौतिक विस्तारच करण्यात आला नसून, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी संस्थेचे चेअरमन मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पावले संस्थेने उचलली असल्याचे मुख्य कार्यकरी आधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांनी सांगितले. शाळेच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करून तिला आधुनिक व नाविन्य रूप देण्यात आले आहे. विशेष म्हणजे २७ एप्रिल १९९७ साली संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला होता. त्यालाही ३० वर्ष पूर्ण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशस्त वर्गखोल्या, अद्ययावत संगणक कक्ष, आणि सुसज्ज प्रयोगशाळा यामुळे विद्यार्थ्यांना आता जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्यास मदत होणार आहे. डिजिटल शिक्षणावर भर देण्यात आला असून, अटल टिंकल लॅब आणि इंटरअॅक्टीव्ह बोर्डसह इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान विद्यार्थ्यांना विद्यालयातून मिळणार असल्याचे डॉ.सुस्मिता विखे पाटील म्हणाल्या.प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच, माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाकरीता प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेचा विशेष पुढाकार असेल. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ अभ्यासच नव्हे, तर क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी चमक दाखवावी, यासाठी क्रीडांगणाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नुकत्याच जिल्हा परिषदेचा क्रिडा महोत्सव संपन्न झाला. अहिल्यादेवींच्या जीवनकार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर शाळा विशेष प्रयत्न करणार आहे.

“अहिल्यादेवींची ३०० वी जयंती हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. त्यांच्या नावाने सुरू असले हे ज्ञानमंदिरं पुढच्या पिढीला सक्षम करण्यासाठी आधुनिक असणे आवश्यक आहे. याच भावनेतून हा नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला”. या नवीन बदलामुळे परिसरातील पालकांनी समाधान व्यक्त केले असून, नव्या शैक्षणिक वर्षापासून हे विद्यालय पूर्ण क्षमतेने नव्या ऊर्जेसह कार्यरत झाले आहे.

डॉ.सुस्मिता विखे पाटील

सीईओ, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!