ब्रेकिंग

दीड वर्षांमध्ये तुमचा खरा चेहरा जनतेने ओळखला – संपतराव डोंगरे

निधीच्या वल्गना प्रत्यक्ष काम नाही

दीड वर्षांमध्ये तुमचा खरा चेहरा जनतेने ओळखला – संपतराव डोंगरे

जाहिरात मो-7756045359
निधीच्या वल्गना प्रत्यक्ष काम नाही
संगमनेर । प्रतिनिधी । लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या सततच्या कामामुळे दुष्काळी तालुका ते विकसित तालुका संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली. संगमनेर म्हटले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच नाव येते यामुळे यांची पोट दुखी झाली त्यातून त्यांनी  मागील दीड वर्षात संगमनेर तालुक्याची बदनामी करण्याचे काम नवीन लोकप्रतिनिधीने केले. आता तुमचा खरा चेहरा जनतेने ओळखला असल्याची टीका ज्येष्ठ नेते शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे यांनी केली आहे.निमज येथे सेवा सोसायटीच्या सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित करताना संपतराव डोंगरे म्हणाले की सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीतून हा तालुका घडला लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्यपूर्ण काम करून तालुक्याला राज्यात अग्रगण्य बनवले. प्रत्येक गावात विकासाच्या योजना राबवल्या. संगमनेर तालुक्याचे नाव घेतले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच नाव येते. त्यामुळे नवीन लोकप्रतिनिधीला ते सहन होत नाही त्यातून त्यांनी तालुक्याची मोठी बदनामी सुरू केली आहे. विधानसभेमध्ये लागलेला निकाल हा महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय ठरला. त्यामध्ये ईव्हीएम असेल लाडकी बहीण असेल किंवा भाजपचे नवनवीन फंडे पैसा वापरला गेला. हा निकाल राज्यातील आणि तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीला मान्य नाही.

आजही जनतेच्या मनात लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच नेतृत्व आहे. संगमनेर म्हटले की लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच नाव घेतले जाते. विकास कामाबद्दल काही माहिती नाही .अभ्यास नाही. तालुक्याची जाण नाही. निधी आणला नाही मात्र मोठमोठ्या  निधीच्या वल्गना करायच्या इतकेच काम ते करत आहेत. प्रत्यक्षात कोणतेही काम त्यांनी केले नाही. जलजीवन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना त्यांच्या हस्तक्षेपामुळेच बंद पडली आहे . उद्घाटनांच्या कार्यक्रमांमध्ये ग्रामपंचायतीने निधीतून दलित वस्तीच्या वीस लाख मंजुरीचे केलेल्या कामांचे उद्घाटन केले आहे यामध्ये यांचे कोणतेही योगदान नाही. अंगणवाडीची योजना सर्व राज्यांमध्ये आहे त्यामध्ये विशेष यांचे कोणतेही योगदान नाही. यामधील अनेक कामांची मंजुरी सुद्धा झाली नाही. ती कामे फक्त फ्लेक्स वर आणि व्हाट्सअप वर दाखवली आहेत.त्यामुळे नवीन लोकप्रतिनिधी निधी आणत नाही फक्त वल्गना करतात.संगमनेर तालुक्याची विकासाची घडी विस्कटावण्याचे काम सध्या सुरू असून गुंडगिरी, टक्केवारी, दहशत, दडपशाही वाढली आहे. त्यामुळे यांचा खरा चेहरा जनतेने ओळखले असल्याची टीका यावेळी त्यांनी केली झेन झी, तरुणाई ,नागरिक महिला या सरकार आणि नवीन लोकप्रतिनिधीवर पूर्णपणे नाराज असून येणारा काळ हा काँग्रेसचाच असेल. सत्ता येते आणि जाते नेतृत्व आणि निष्ठा मात्र कायम राहते. हीच खरी महाराष्ट्राची परंपरा आहे. नवीन लोकप्रतिनिधीने आतापर्यंत चार पक्ष बदलले . मात्र निष्ठावंत नेते म्हणून नाव घेतले जाते ते लोकनेते बाळासाहेब थोरात यांचेच नाव घेतले जात असून संगमनेर तालुक्यातील जनता ही त्यांच्याच पाठीशी उभे असल्याचेही संपतराव डोंगरे यांनी म्हटले आहे.

पाण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचाच संघर्ष

1989 मध्ये संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मिळून दिले त्यानंतर उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व उजवा आणि डावा कालवा पूर्ण केला. भोजापुर चारीही थोरात कारखान्याच्या मदतीने झाली आहे. ती काही आठ महिन्यात झाली नाही. या कामांमध्ये अडथळे आणणारे पूर्वेकडील नेते आणि आत्ताचे त्यांचे समर्थक यांचे कालवे व भोजपुर चारित कोणतेही योगदान नाही. त्यांना कालवे सुद्धा अजून माहित नाही हे सर्व जनतेला माहित आहे. अगोदर माहिती करून घ्यावी. एखादी योजना पूर्ण करावी आणि मग बोलावे असा टोला उपसरपंच अरुण गुंजाळ यांनी नवीन लोकप्रतिनिधी यांना लगावला आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!