ब्रेकिंग

एकविराच्या 450 युवक व युवतींनी गणेश विसर्जनात मदत करत केली निर्माल्याची साफसफाई

एकविराच्या 450 युवक व युवतींनी गणेश विसर्जनात मदत करत केली निर्माल्याची साफसफाई

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जनात युवक युवतींची नागरिकांना मोठी मदत

संगमनेर । प्रतिनिधी । महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करताना अत्यंत शांततापूर्वक व आनंदाच्या वातावरणात गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न झाली असून या मिरवणुकीमध्ये कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविराच्या 450 युवक व युवतींनी गणेश विसर्जनासाठी नागरिकांना मोठी मदत केली असून प्रवारानदीकाठी निर्मल्याचे संकलन करून साफसफाई केली.

गणेश उत्सवानिमित्त संगमनेर शहरातील अनेक मानाचे गणपती, विविध मंडळांचे गणपती, व घरगुती गणपती यांना सुरक्षित विसर्जन करण्यासाठी एकविरा फाउंडेशन नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा नदीकाठी मोठी व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांसमवेत वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,आमदार सत्यजित तांबे सौ दुर्गाताई तांबे , नगराध्यक्ष डॉ. सौ .मैथिलीताई तांबे यांनीही गणेश विसर्जनात सहभाग घेतला. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात तालुक्यातील 450 युवक व युवतींनी गणेश विसर्जनासाठी नागरिकांना मोठी मदत केली याचबरोबर परिसरात साचलेल्या निर्मलांचे संकलन केले.

प्रवरा नदीकाठी गंगामाई घाटावर , म्हाळुंगी नदीच्या काठावर विविध ठिकाणी गणेश विसर्जन करण्यात आले .यावेळी या युवकांनी विविध ठिकाणी सेवा देत निर्माण याचे संकलन केले .याच प्रमाणे 50- 50 च्या गटागटांनी उभे राहून नागरिकांना मदत केली .येणाऱ्या भाविकांना पाण्याची माहिती सांगून निर्माल्य संकलन करण्याचे आव्हान केले. याचबरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने आलेल्या कनवेअर माध्यमातून गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, यावर्षी अलनिनोमुळे पावसाचे मोठे संकट निर्माण झाले आहे दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये पाण्याची बचत महत्त्वाची ठरणार आहे. शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करत शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांना मोठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले याचबरोबर उर्वरित काळात महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी व बळीराजा आनंदी होऊ दे अशी प्रार्थना ही त्यांनी केली.एकविरा फाउंडेशनने मागील सात वर्षापासून गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नागरिकांना मदत करताना निर्मल्याची संकलन केले आहे. अत्यंत अभिमानाचा उपक्रम आहे .यामध्ये अनेक युवक स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतात. नागरिकांना मदत होत असल्याने सर्व नागरिक एकत्र येऊन हे गणेश विसर्जन करतात. दुर्घटना घडू नये नागरिकांना मदत व्हावी हा उद्देश असून एकविरा फाउंडेशनच्या युवकांचे हे काम कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.आमदार सत्यजित तांबे म्हणाले की ,गणेश उत्सव बारा दिवस होता. प्रत्येकाच्या घरात आनंदाचे वातावरण होते आज शेवटचा दिवस असल्याने गणेश विसर्जनासाठी अनेक नागरिक नदीकाठी येत आहेत. या सर्वांना सेवा देण्याचे काम एकविराचे सर्व सदस्य करत आहेत. थोरात कारखान्याने यांत्रिकीकरणाची मदत देऊन दुर्घटना टाळण्यासाठी मोठी मदत केली आहे सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा अशी प्रार्थना त्यांनी केली.तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाबरोबरच सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग दिला जात आहे .मागील सात वर्षापासून आम्ही ही सेवा करत असून यावर्षी दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी आनंदी होऊ दे. घराघरात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा झाला असून गणेशाला निरोप देताना अनेक जण दुखी आहेत. अनेक जण भावनिक होऊन अनेकांना अश्रू आणावर झाले आहे. परंतु ही परंपरा आहे.प्रवरा काठाबरोबरच जाणता राजा मैदानावर कृत्रिमतळे करण्यात आली असून अनेकांनी त्या ठिकाणी गणेश विसर्जन केले आहे.या गणेशोत्सवानंतर निर्माल्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढते. त्यातून रोगराई वाढते .म्हणून एकविरा फाउंडेशनच्या युवक व युवती स्वच्छता करत आहे. आणि त्यामधून आरोग्याचा चांगला संदेश जात असल्याचे त्या म्हणाल्या.

विसर्जनासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकार साखर कारखान्याची मदत

प्रवरा नदीकाठी असलेल्या खोल व जास्त पाण्यामुळे दुर्घटना घडू नये. सुरक्षित गणेश विसर्जन करता यावे याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कन्हेअर बसवल्यामुळे नागरिकांना गणेश विसर्जनासाठी जास्त मोठी मदत झाली. याचबरोबर नदीकाठी सुरक्षारक्षक, एकविराचे सैनिक, पोहणारे युवक, आरतीची व्यवस्था अशी सर्व व्यवस्था एकवीरा फाउंडेशनच्या वतीने केल्याने नागरिकांना चांगली सुविधा मिळाली या सर्व कामांसाठी संगमनेर नगरपालिकेने मोठी मदत केली असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!