ब्रेकिंग

जनतेच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरले; गणेशोत्सवात पोलिसांची कर्तव्यनिष्ठ सेवा!

जनतेच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरले; गणेशोत्सवात पोलिसांची कर्तव्यनिष्ठ सेवा!

जनतेच्या आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरले; गणेशोत्सवात पोलिसांची कर्तव्यनिष्ठ सेवा!

कोपरगांव । विनोद जवरे । गणेशोत्सव म्हटला की आनंद, उत्साह, भक्ती आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. मात्र, नागरिक गणरायाच्या उत्सवात मनमुराद आनंद घेत असताना, त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी मात्र रात्रंदिवस कर्तव्यावर तैनात असतात. यंदाचा तब्बल बारा दिवसांचा गणेशोत्सव कोपरगाव शहर व तालुक्यासह परिसरात अतिशय शांततेत पार पडला, यामागे पोलिसांचे नियोजन, संयम आणि कर्तव्यनिष्ठ सेवा महत्त्वाची ठरली.

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सवाच्या काळात उत्तम नियोजन केले.गणेश मंडळे, विसर्जन मार्ग, गर्दीची ठिकाणे तसेच संवेदनशील परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधत उत्सव शांततेत पार पडण्यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना यश आले.

नागरिक उत्सवात रमले, पोलीस मात्र कर्तव्यावर!

नागरिक आपल्या कुटुंबीयांसोबत गणरायाची आरती, पूजा आणि उत्सवाचा आनंद घेत होते; त्याच वेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी मात्र रस्त्यावर, चौकाचौकात आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर कर्तव्य बजावत होते. अनेक पोलिसांना आपल्या कुटुंबापासून दूर राहून जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे लागले.गणेश विसर्जनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी, मिरवणुका, ढोल-ताशे आणि भाविकांचा उत्साह असतानाही पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत उत्सव शांततेत पार पाडला. विशेष म्हणजे, गणेश भक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहूनच पोलिसांनी आपला आनंद मानला, असे चित्र या काळात पाहायला मिळाले.

उत्सव नागरिकांचा; जबाबदारी पोलिसांची!

गणेशोत्सव हा नागरिकांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव असला, तरी तो सुरक्षित व शांततेत पार पाडण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. ही जबाबदारी कोपरगाव शहर व तालुका पोलिसांनी अत्यंत चोखपणे पार पाडली.स्वतःच्या कुटुंबाचा आनंद बाजूला ठेवून हजारो गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक उद्धव ढमाळे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

आपला आनंद, त्यांचे कर्तव्य!
नागरिक गणरायाच्या उत्सवात आनंद साजरा करत असताना, पोलीस अधिकारी व कर्मचारी मात्र जनतेच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस कर्तव्य बजावत होते. बारा दिवसांचा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी घेतलेले पोलिसांचे अथक परिश्रम आणि नियोजन कौतुकास्पद!

जनतेचा उत्सव आनंदात पार पडला, कारण पोलीस आपल्या कर्तव्यावर ठाम होते. बारा दिवसांच्या गणेशोत्सवात पोलिसांनी दाखवून दिलेली ही कर्तव्यनिष्ठ सेवा निश्चितच सलाम करण्यासारखी आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!