ब्रेकिंग

खाकी वर्दीतील माणुसकीचा स्पर्श; पोहेगावात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा चिमुकल्याशी मनमोकळा संवाद!

खाकी वर्दीतील माणुसकीचा स्पर्श; पोहेगावात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा चिमुकल्याशी मनमोकळा संवाद!

खाकी वर्दीतील माणुसकीचा स्पर्श; पोहेगावात पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचा चिमुकल्याशी मनमोकळा संवाद!

कोपरगांव । प्रतिनिधी । अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वानिमित्त पोहेगाव येथील प्रसिद्ध श्री मयुरेश्वर गणपती मंदिरात कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी मंदिरातील महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर परिसरात एका चिमुकल्या मुलाची आणि पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांची झालेली मनमोकळी भेट उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी या चिमुकल्याशी आपुलकीने संवाद साधत, “बाळा, तू मोठा झाल्यावर काय होणार? चांगला अभ्यास कर,” अशा प्रेमळ शब्दांत त्याला प्रोत्साहन दिले. खाकी वर्दीतील अधिकारी आणि एका लहानग्यामधील हा सहज, प्रेमळ संवाद पाहताना उपस्थितांना एक वेगळाच अनुभव आला.पूर्वीच्या काळात पोलीस दिसले की लहान मुले घाबरून दूर पळायची किंवा लपून बसायची, अशी एक प्रचलित समजूत होती. मात्र, आजच्या काळात पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवादाचे नाते अधिक आपुलकीचे होण्याची गरज आहे. पोहेगाव येथे दिसलेले हे दृश्य त्याच सकारात्मक बदलाची एक सुंदर झलक ठरले.पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी चिमुकल्याशी कोणताही औपचारिकपणा न ठेवता साधलेल्या संवादातून पोलीस अधिकारी म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारे व्यक्ती नसून, समाजातील प्रत्येक घटकाशी आपुलकीने जोडले जाणारे माणूसही आहेत, हा संदेश अधोरेखित झाला. गणपती बाप्पाच्या दर्शनाच्या निमित्ताने घडलेला हा छोटासा प्रसंग उपस्थितांच्या मनात मात्र मोठी आठवण निर्माण करून गेला. पोलिसांविषयी लहान मुलांच्या मनात विश्वास, जिव्हाळा आणि सकारात्मक भावना निर्माण होण्यासाठी अशा संवादांचे महत्त्व अधोरेखित झाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!