ब्रेकिंग

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदाही तालुके ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर; पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिलात सवलत आणि परीक्षा शुल्क माफीसह सर्व सवलती लागू: –  ना. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदाही तालुके ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर; पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिलात सवलत आणि परीक्षा शुल्क माफीसह सर्व सवलती लागू: –  ना. राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदाही तालुके ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर; पीक कर्ज पुनर्गठन, वीज बिलात सवलत आणि परीक्षा शुल्क माफीसह सर्व सवलती लागू: –  ना. राधाकृष्ण विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी । जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सर्व तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असून, यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना व सवलती लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.जिल्ह्यामध्ये यावर्षी कोणत्याही तालुक्यामध्ये सरासरीइतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची परिस्थितीही गंभीर झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातील तालुक्यांना दुष्काळाच्या सवलती लागू कराव्यात अशी विनंती केली होती. यापूर्वी जिल्हा आणि तालुका स्तरावर टंचाई परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकींमध्ये समोर आलेल्या माहितीप्रमाणे शासनास अहवालही सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील खरीप हंगामातील टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांचा समावेश असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

चौदा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व उपाययोजनांचा व सवलतींचा लाभ मिळणार असून, यामध्ये प्रामुख्याने पीक कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसुलात सूट, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीज बिलात सूट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे, आवश्यक तेथे पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची व्यवस्था, टंचाई जाहीर झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे, शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी, मजूर इत्यादींना अन्नधान्याची टंचाई भासणार नाही यासाठी व्यवस्था उभी करणे, जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे तसेच यापूर्वी निर्गमित करण्यात आल्याप्रमाणे उपलब्ध पाणी पिण्यासाठी तसेच जनावरांसाठी राखून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, यापूर्वी कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू करून त्याचा दिलासा शेतकऱ्यांना दिला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.शासन आदेशाप्रमाणे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व निर्णयांची अंमलबजावणी संवेदनशीलपणे सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्री ना. विखे पाटील यांनी दिल्या असून सर्व निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा तालुकानिहाय आपण घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!