ब्रेकिंग
काँग्रेस नेते मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागणीतून राज्यात दुष्काळ जाहीर
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी गरजेची

संगमनेर । प्रतिनिधी । अलनिनोच्या प्रभावामुळे यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. खरिपाची पिके वाया गेली असून राज्य सरकारने तातडीने सरसकट दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना भरी मदत करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने केली असून या मागणीला यश मिळाले असून राज्यांमध्ये आज सरकारने 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्याने या तालुक्यामधील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी राज्यभरात सर्व भागांमध्ये अत्यंत कमी पाऊस झाला . ऑगस्ट व सप्टेंबर महिना पूर्ण कोरडा गेल्याने पावसाअभावी पिके सुकू लागली. त्यामुळे हा हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक पूर्णपणे वाया गेले. राज्यभरातील शेतकरी हवालदिल झाला पाऊस होईल अशी शक्यता कोणतीही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांना व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला पाहिजे या मागणी करता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने आग्रह केला.

संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमधून हजारो नागरिकांसमोर याच विषयावरून सरकारला जागे करताना दुष्काळ जाहीर करण्याची सातत्याने मागणी केली. याचबरोबर आता पंचनामांची कोणतेही फार्स न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अशी मागणी केली.राज्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर व्हावा. संगमनेर तालुक्यात हक्काचे पाणी व पूर्ण दाबाने वीज मिळावी याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संगमनेरमध्ये हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भव्य जन आक्रोश मोर्चा काढला.या जनआक्रोश मोर्चा मधून सरकारचे लक्ष वेधताना संपूर्ण राज्यांमध्ये कोणताही पंचनामा न करता तातडीने दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना भरी मदत द्यावी. शेतीवर काम करणारे शेतमजूर जे आहेत त्यांचा रोज सरकारने द्यावा. दुष्काळी कामे सुरू करावी. पाण्याचे नियोजन करावे याचबरोबर वीजपुरवठा सुरळीत करावा तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे अशा विविध मागण्या केल्या.याचबरोबर ज्या ज्या वेळेस शेतकरी अडचणीत असतो त्यावेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे सांगताना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आणि काँग्रेस सरकारच्या काळामध्ये सातत्याने सरकारने शेतकऱ्यांना मदत केली आहे याची आठवण ही करून दिली. याचबरोबर जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून जागे व्हा असे आव्हान करताना सरकार जागे झाले नाही तर शेतकरी त्यांना जागा सोडायला लागेल असेही सांगितले.राज्यभरात गणेश उत्सवाची धामधूम सुरू असताना दुष्काळाची चाहूल ओळखतात शेतकऱ्यांचे नेते अशी ओळख असलेले देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांनी सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी ही दिल्या.पाठोपाठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यभरात सरसकट दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व विविध खात्यांच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी दिल्या यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुष्काळ जाहीर करून 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांचा या दुष्काळी योजनांमध्ये समावेश केला. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.शेतकऱ्यांची जाण असलेले ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार व काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.मात्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी सातबारा पूर्णपणे कोरा करावा याचबरोबर शेतमजूर यांना त्यांचा रोज देण्यात यावा विविध दुष्काळी योजना कागदपत्र न करता तातडीने सर्व नागरिकांना मिळाव्यात अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.