ब्रेकिंग

खासदारांना स्वीडन कुठं ते माहित नाही ! दोन वर्षांत १ रुपयांचा निधी आणि शकले नाही जिल्ह्यासाठी काही करू शकले नाही कौटुंबिक वादात राजकारण करणं जिल्ह्यासाठी धोकादायक – डॉ सुजय विखे पाटील

अहिल्यानगर । प्रतिनिधी । खासदारांचे काही ठरलेले डायलॉग आहेत. त्यांना स्वीडन कुठे आहे, हेही माहिती नाही, त्यामुळे त्यांनी या विषयावर भाष्य करू नये.दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, मागील दोन वर्षांत या जिल्ह्याच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आणता आला नाही. जिल्ह्यासाठी ठोस काम करता आलं नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या कौटुंबिक वादात किंवा कौटुंबिक संवादात पडून त्याचं राजकारण करणं, ही विचारसरणीच या जिल्ह्यासाठी धोकादायक आहे.राजकीय व्यक्तीचं राजकीय आणि व्यक्तिगत असं दोन वेगळं आयुष्य असतं. राजकीय आयुष्यात पक्ष असतात, पक्षाच्या भूमिका असतात आणि आरोप-प्रत्यारोपही होतात. मात्र, व्यक्तिगत आयुष्याची एक मर्यादा असते.गेल्या काही वर्षांत खासदारांवर अनेक आरोप झाले. महिलांशी संबंधित आरोप झाले, कॉल रेकॉर्डिंगही समोर आली. मात्र, मी कधीही त्या मुद्द्यांचा राजकीय फायदा घेऊन भाष्य केलेलं नाही. माझी एकही बाईट दाखवा, ज्यामध्ये मी खासदारांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा चारित्र्यावर भाष्य केलं आहे.कारण व्यक्तिगत आयुष्यात कोणाच्याही जाणं योग्य नाही, हा सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जपला आहे आणि तोच सुसंस्कृतपणा जपण्याचा मी प्रयत्न करतोय.मात्र, ज्यांना समाजाच्या आणि जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, ते दुसऱ्यांच्या कौटुंबिक विषयांना राजकीय मुद्दा बनवत असतील, तर त्यावर जनतेने नक्कीच विचार केला पाहिजे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!