ब्रेकिंग

डॉ. सुजय विखे पाटील यांचा रोहित पवारांना सल्ला; “राजकारणात लक्ष्मणरेषा राहू द्या, महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपा

डॉ. सुजय विखे पाटील यांचा रोहित पवारांना सल्ला; “राजकारणात लक्ष्मणरेषा राहू द्या, महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपा

डॉ. सुजय विखे पाटील यांचा रोहित पवारांना सल्ला; “राजकारणात लक्ष्मणरेषा राहू द्या, महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपा

लोणी । प्रतिनिधी । मला माहित नाही की रोहित पवार माध्यमांमध्ये नेमकं काय बोलले आहेत. मात्र, माझी त्यांना नम्र विनंती आहे की, तुम्ही एका सुसंस्कृत परिवारातून आलेले लोकप्रतिनिधी आहात.कौटुंबिक विषय माध्यमांसमोर आणण्याचे काम ना पवार परिवाराने कधी केले, ना विखे पाटील परिवाराने केले. आमचा छोटा परिवार आहे. मात्र, त्यांच्या कौटुंबिक विषयांवर मी बोलायला लागलो, तर त्यावर किती मोठी चर्चा होऊ शकते, याचा विचार आपण करू शकतो. पण आम्ही सभ्यता आणि सुसंस्कृतपणा पाळतो आणि त्यांनीही तो पाळावा, अशी माझी अपेक्षा आहे.

तुम्ही आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर टीका करा, सरकारच्या कामावर टीका करा; मात्र कौटुंबिक वादामध्ये पडू नका, ही माझी त्यांना नम्र विनंती आहे.आणखी एक मुद्दा म्हणजे, ते म्हणत असतील की जनतेने याचा विचार केला पाहिजे. तर मी एवढंच सांगू इच्छितो की, आम्ही आज पक्षांतर केलं असेल किंवा आमच्याबाबत काहीही राजकीय भूमिका असतील, तरी मागील पाच विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने आम्हाला महाराष्ट्रातील पहिल्या पाच मताधिक्यांमध्ये स्थान दिलं आहे.त्यामुळे कोणाच्या बोलण्याने आम्ही मोठे किंवा लहान होणार नाही. आमचं काम जनसामान्यांचं कल्याण करणं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि अहिल्यानगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही काम करत राहू.मात्र, महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जपण्याची जबाबदारी केवळ माझी नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधीची ती जबाबदारी आहे. राजकीय टीका करताना कौटुंबिक टीका होऊ नये, हीच माझी अपेक्षा आहे.अन्यथा राजकारणामध्ये कोणतीही मर्यादा किंवा लक्ष्मणरेषा उरणार नाही आणि त्यातून अत्यंत गलिच्छ राजकारण निर्माण होईल. असं राजकारण महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सुसंस्कृत परंपरेला निश्चितच शोभणार नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!