लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली – आमदार आशुतोष काळे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली – आमदार आशुतोष काळे


लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या विचारांनी
महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली – आमदार आशुतोष काळे
कोपरगांव । प्रतिनिधी । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीला नवी दिशा दिली. त्यांनी उपेक्षित, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या व्यथा प्रभावीपणे मांडून समानता, न्याय आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. स्वातंत्र्य चळवळ व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

समाजातील शोषित, वंचित आणि सर्वसामान्यांच्या जीवन संघर्षाला आपल्या लेखणी व शाहिरीतून आवाज देणारे थोर साहित्यिक, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथील त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही समाजाला एकतेचा, संघर्षाचा आणि परिवर्तनाचा मार्ग दाखवतात. त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक समता,न्याय आणि सर्वसमावेशक विकासासाठी कार्यरत राहणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोपरगाव शहरात विविध ठिकाणी जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक कार्यक्रमांना आमदार आशुतोष काळे यांनी भेट देवून सर्वांना शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी नितीन साबळे, अर्जुन मरसाळे, राजेंद्र खैरनार, दिलीप तुपसुंदर, संतोष मरसाळे, सुनिल वैरागळ, राजेंद्र वैरागळ, संजय साळवे, भागवत साहेब, रवी धिवर,भारत सदर, राजेंद्र कांबळे, समाधान शिंदे, बुधा भालेराव, सचिन आहिरे, अनिल आवारे, सचिन पाटोळे, पवन निर्मळ, शुभम आहिरे, अरुण मरसाळे, अजय जगधने, नितीन ताकवणे, विजय मरसाळे, राहुल सौदागर, दिपक मरसाळे, आकाश मरसाळे, अमोल सौदागर, दिनेश गायकवाड, मयूर रीळ, ज्ञानेश्वर घोडेस्वार, सनी रिळ, रंगनाथ मरसाळे, रवींद्र मरसाळे, नामदेव पगारे, मंगेश मरसाळे, रणवीर आहिरे, किशोर आहिरे, फकीरा चंदनशिव, संदिप निरभवणे आदी समाजबांधवांसह सुनिल गंगुले, नगरसेवक मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, शैलेश साबळे, विजय त्रिभुवन, संदिप कपिले, राहुल शिरसाठ, इम्तियाज अत्तार, सोमनाथ आढाव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक कृष्णा आढाव, बाळासाहेब आढाव, शिवाजी खांडेकर, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, अरुण त्रिभुवन, सचिन परदेशी, जावेद शेख, राहुल सोनवणे, राजेंद्र जोशी, मुकुंद भूतडा, प्रशांत वाबळे, सागर आहेर, संदिप सावतडकर, विशाल निकम, अनिल जाधव, प्रसाद रुईकर, प्रदीप कुऱ्हाडे, योगेश वाणी, गणेश गोसावी, नितीन शेलार, मयूर राऊत, भाऊसाहेब भाबड, संजय दुशिंग, राजेंद्र उशिरे, दिनेश गाडेकर, ओम आढाव, हर्षल जैस्वाल, हारुण शेख, अजय शेळके उपस्थित होते.



