प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाच्या शोधासाठी थोरात कारखान्याच्या यंत्रणेची मदत
सौ दुर्गाताई तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात तातडीने घटनास्थळी

प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणाच्या शोधासाठी थोरात कारखान्याच्या यंत्रणेची मदत


सौ दुर्गाताई तांबे व डॉ. जयश्रीताई थोरात तातडीने घटनास्थळी

यानुसार सौ दुर्गाताई तांबे व डॉ जयश्रीताई थोरात , नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे या गंगामाई घाटावर पोहोचल्या. थोरात कारखान्याची व नगरपालिकेची यंत्रणा तातडीने मदतीसाठी धावली. आणि कार्यकर्त्यांनी स्वयंस्पृतिने शोध मोहिमेत सहभाग घेतला यामध्ये कारखान्याचे इंजिनिअर किशोर देशमुख, महेश म्हशे ,मुन्ना यादव, आनंदा पवार ,रंजीत उघडे, सागर कातोरे ,सरोज यादव, कनोज यादव ,मनोज यादव यांच्यासह विविध कार्यकर्त्यांनी नदीमध्ये शोध मोहिमेत सहभाग घेतला.

नगरपालिकेचे सुरक्षा जवानही तातडीने सर्व मदत करत होते यावेळी नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, नगरसेवक नितीन अभंग, यांच्यासह लाला पठाण, नूर मोहम्मद शेख , निखिल पापडेजा वैष्णव मुर्तडक,यांच्यासह विविध नगरसेवक दाखल झाले सर्वांनी युवकाच्या शोध मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.प्रशासन सहकार आणि युवक कार्यकर्ते यांच्या मदतीने ऋषिकेश नवनाथ गडाख यांचा अध्यापही शोध सुरू आहे. या घटनेने संपूर्ण शहरामध्ये हळहळ सुरू झाली असून नागरिकांनी अधिक सतर्क रहावे. नदीकाठी जाऊन स्टंटबाजी करू नका जीवाची काळजी घ्या असे आवाहन सौ दुर्गाताई तांबे यांनी केले असून प्रशासनाने व नागरिकांनी युवकांना अधिक समज देत काळजी घेण्याचे आव्हान डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले आहेयाचबरोबर ऋषिकेश गडाख यांच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना सौ दुर्गाताई तांबे व डॉ जयश्रीताई थोरात यांनी यावेळी गावातील ग्रामस्थ ही व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते



