ब्रेकिंग
जुलै फॉर काइंडनेस मधून सकारात्मकता वाढीस मोठी मदत – डॉ.जयश्रीताई थोरात
अभिनव उपक्रमास नागरिकांसह झेन - झी चा मोठा प्रतिसाद

जुलै फॉर काइंडनेस मधून सकारात्मकता वाढीस मोठी मदत – डॉ.जयश्रीताई थोरात

अभिनव उपक्रमास नागरिकांसह झेन – झी चा मोठा प्रतिसाद
संगमनेर । प्रतिनिधी । समाजामध्ये वाढत चाललेली नकारात्मकता कमी करून सर्वांच्या प्रति जिव्हाळा आपुलकी निर्माण व्हावी यासाठी राबवण्यात आलेल्या जुलै फॉर काइंडनेस या आपुलकी, जिव्हाळा, प्रेमभावना वाढवणाऱ्या अभिनव उपक्रमामुळे समाजात सकारात्मकता वाढीस लागले असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले असून या उपक्रमाला तालुक्यातील नागरिक महिला युवकांसह झेन – झी चा मोठा प्रतिसाद लाभला.

वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा सातत्यपूर्ण विकास कामांबरोबर, सहकार, शिक्षण कृषी ग्रामीण विकास दुग्धविकास, शेती पूरक व्यवसाय, मेडिकल सुविधा, सहिष्णुता, आदरभाव, जिव्हाळा आत्मीयता आणि प्रामाणिकपणा या बाबींसाठी राज्यभरात आदराने ओळखला जातो. ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्याने विविध उपक्रम राज्याला दिली असून समाजामध्ये सहिष्णुता व आदरभाव वाढावा याकरता डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून जुलै महिन्यामध्ये जुलै फॉर काइंडनेस हा उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमांतर्गत तालुक्यातील 171 गावे व 258 वाड्यावर शालेय विद्यार्थी, युवक नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. सार्वजनिक स्वच्छता, वृक्षारोपण वृक्ष संवर्धन, ज्येष्ठान प्रति आदर, आई – वडिलांना कामात मदत, आजी आजोबांशी गप्पा, इतरांना मदत असे अनेक उपक्रम तालुका भर राबवले गेले. पशुपक्षी यांच्या प्रति जिव्हाळा आणि आत्मीयता वाढली. उपक्रम संपूर्ण महिन्यांमध्ये सर्वत्र राबविण्यात आला.याचबरोबर महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालय मध्यवर्ती ठिकाणी काइंडनेस ट्री बनवण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येकाने दिवसभर केलेल्या वेगळ्या उपक्रमाचे नोंद करण्यात आली असून ही काइंडनेस ट्री सकारात्मक बाबींच्या विविध उपक्रमांनी बहरली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी आजी – आजोबांना केलेली मदत रस्त्याच्या कडेला केली स्वच्छता, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचे इतरांना सांगितलेले महत्त्व, आरोग्य सेवेसाठी केलेली मदत, अशा अभिनव बाबींचा समावेश आहे. विशेष म्हणजे इयत्ता पहिली ते पदवीधर पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या व युवकांच्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहेत.विविध शाळा महाविद्यालय ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा यामधूनही अनेक विद्यार्थ्यांनी काइंडनेस दूत म्हणून चांगले काम केले. लहान मुलांमध्ये निर्माण झालेली ही आपुलकीची व जिव्हाळ्याची भावना नक्कीच राज्यासाठी दिशादर्शक पॅटर्न ठरणार आहे.

समाजामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी हा उपक्रम – डॉ.जयश्रीताई थोरात
सर्व संत समाज सुधारक यांनी मानवतेचा धर्म सांगितला आहे. एकमेकांना मदत करत एकमेकांचा आदर केला पाहिजे. ही सहिष्णुता आदरभाव प्रेमभाव वाढीस लागावा याकरता जुलै फॉर काइंडनेस हा उपक्रम राबविण्यात आला. समाजामध्ये वाढलेली नकारात्मकता सोडून सकारात्मक गोष्टी वाढाव्या यासाठीच्या उपक्रमामध्ये सर्वांनी अत्यंत सक्रिय सहभाग घेतला हे आनंददायी आहे. हीच भावना घेऊन यापुढेही सर्व युवकांनी व नागरिकांनी काम करावे हा उद्देश मंथ ऑफ काइंडनेस मधून असल्याचे कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.