थोरात कारखान्याकडून दीपावली निमित्त 19 कोटी बँकेत वर्ग

संगमनेर ( प्रतिनिधी ) देशातील सहकारी साखर कारखान्यासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सभासद, ऊस उत्पादक,शेतकरी, व कामगार यांचे हित जोपासले असून दीपावली निमित्त 19 कोटी रुपये बँकेत वर्ग केले असल्याची माहिती चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने आर्थिक शिस्त, पारदर्शकता, काटकसर व उत्तम गुणवत्ता यामुळे संपूर्ण देशांमध्ये आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी दहा लाख मे. टना पेक्षा जास्त गाळप कारखान्याने केले आहे. 2800 रुपये पूर्वी प्रति टन भाव दिला होता. दिवाळीनिमित्त कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 215 रुपये भाव दिला असून यामुळे एकूण 3015 रुपये शेतकऱ्यांना मिळाला आहे. कर्मचाऱ्यांना 20 टक्के बोनस व 30 दिवसांचे सानूग्रह अनुदान दिले आहे
कर्मचाऱ्यांचा बोनस व पगाराचे 9 कोटी रुपये तसेच 215 रुपये प्रति टन प्रमाणे भाव आणि ठेवीवरील व्याज 10 कोटी रुपये असे एकूण 19 कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहे. यापूर्वी दूध संघाने 37 कोटी रुपये बँकेत वर्ग केले आहे. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे सुमारे 100 कोटी रुपये बँकेत वर्ग झाल्याने बाजारपेठ फुलली आहे. बाजारपेठेमध्ये मोठी आर्थिक ऊलाढाल होत आहे . यावर्षी संगमनेर तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. याचबरोबर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून दुष्काळी भागाला निळवंडे कालव्यातून पाणी मिळाल्याने शेतकरी ,सर्वसामान्य नागरिक आनंदी आहे. अमृत उद्योग समूहातील विविध संस्था व कारखान्याने वर्ग केलेल्या 19 कोटी रुपयांमुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असून संगमनेरची बाजारपेठ व व्यापाऱ्यांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. कारखान्याने घेतलेल्या या निर्णयामुळे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा चेअरमन संतोष हासे ,सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन होत आहे.