ब्रेकिंग

खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठी मदत होईल – मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

सोयाबीन हमीभाव केंद्राचे उद्घाटन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठी मदत होईल – मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

सोयाबीन हमीभाव केंद्राचे उद्घाटन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

राहाता । प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या माध्यमातून कृषि उत्पन्न बाजार समितीने सुरू केलेल्या सोयाबीन हमीभाव केंद्राचे उद्घाटन जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. खरेदी केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रातून ६नोव्हेंबर पासून नोंदणी प्रक्रीया सुरू आहे.सध्या बाजारात सोयाबीन दरामध्ये असलेली अस्थिरता पाहाता शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा म्हणून सरकारने सुरू केलेली योजना उपयुक्त ठरणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.सध्या खरेदी केंद्रात १हजार २८४अर्ज प्राप्त झाले असून,५७०शेतकर्यांनी आॅनलाईन नोंदणी केली असून शेतकऱ्यांना ५हजार ३२८प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांनी सांगितले.

केंद्रामध्ये सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी अजूनही विचारणा करीत असून,केंद्रमध्ये नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा निर्माण करून दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले नोंदणीसाठी आवश्यक असलेले कागदपत्र वेळेत सादर करण्याचे आवाहन समितीचे सचिव सुभाष मोटे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!