ब्रेकिंग

श्रीरामपूर येथे प्रवरा नदीपात्रात अवैध वाळु वाहतुकीविरूध्द गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीकडून रु. 5,10,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर येथे प्रवरा नदीपात्रात अवैध वाळु वाहतुकीविरूध्द गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीकडून रु. 5,10,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर येथे प्रवरा नदीपात्रात अवैध वाळु वाहतुकीविरूध्द गुन्हे शाखेची कारवाई; आरोपीकडून रु. 5,10,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर । प्रतिनिधी ।  मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले आहे. नमुद आदेशान्वये संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोलीस अंमलदार रणजीत जाधव यास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांचे मदतीने अवैध वाळु उपसा व वाहतुक करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेकामी पाठविले.

दिनांक 16/08/2026 रोजी पोलीस अंमलदार रणजीत जाधव, स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोलीस अंमलदार आर.डी.ढोकणे व विनोद उंडे असे श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध वाळु वाहतुक करणाऱ्यांची माहिती काढत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे अभी राऊत, रा.भेर्डापूर, ता.श्रीरामपूर हा प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळु वाहतुक करणार आहे. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष प्रवरा नदीपात्राजवळ जाऊन खात्री केली असता संशयीत इसम नदीपात्रातून टेम्पो घेऊन येत असताना मिळून आल्याने वाहन चालकास टेम्पो थांबवून, पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन टेम्पोची तपासणी केली असता त्यास वाळु मिळून आल्याने 1) वाहन चालक रोहित बाळासाहेब राऊत, वय 26, रा.भेर्डापूर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर व 2) वाहन मालक अभिजीत बाळासाहेब राऊत, वय 24, रा.भेर्डापूर, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीचे कब्जातून 5,00,000/- रू किं.त्यात टाटा कंपनीचा विनाक्रमांकचा टेम्पो व 10,000/- रू किं.वाळु असा एकुण 5,10,000/- रू किं.मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.आरोपीविरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. 312/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे. वरील कारवाई ही मा.श्री.मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!