निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या बचावासाठी कोल्हेंच्या उपनगराक्षांसह नगरसेवकांची फौज धावली – नगरसेवक राहुल शिरसाठ

निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या बचावासाठी कोल्हेंच्या उपनगराक्षांसह नगरसेवकांची फौज धावली – नगरसेवक राहुल शिरसाठ

निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या बचावासाठी कोल्हेंच्या उपनगराक्षांसह नगरसेवकांची फौज धावली – नगरसेवक राहुल शिरसाठ
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव शहरात होणारी विकासकामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे असून त्या विकासकामांचा नागरिकांना जास्तीत जास्त उपयोग झाला पाहीजे. हा दृष्टीकोन ठेवून प्रभाग क्रमांक ०२ मधील सुख शांतीनगर येथे सुरु असलेल्या ओपन स्पेसमधील संरक्षण भिंतीच्या निकृष्ठ कामाबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेवून ते काम थांबविले. सदरच्या कामाचे भूमिपूजन चुकीच्या पद्धतीने, काम चुकीचे आणि ठेकेदारही चुकीचा असतांना निकृष्ठ दर्जाचे असलेले काम उत्कृष्ठ दर्जाचे असल्याचा साक्षात्कार झालेल्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या उपनगराक्षांसह नगरसेवकांची फौज ठेकेदाराच्या बचावासाठी धावली यावरून कोपरगावच्या जनतेने काय तो बोध घ्यावा असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवक राहुल शिरसाठ यांनी म्हटले आहे.

कोपरगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक ०२ मधील सुख शांतीनगर येथे ओपन स्पेसमधील संरक्षण भिंतीचे काम सुरु असून सुरु असलेले काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी त्याबाबत कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारून सदरचे काम चांगल्या दर्जाचे व गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी संबंधित ठेकेदारालाही त्याबाबत चांगलेच सुनावले होते.सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या करातून मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा व विरोधी पक्षाची भूमिका चोखपणे पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी सुरु असलेल्या कामाबाबत आक्रमक पवित्रा घेतला होता.परंतु ठेकेदारासोबत असलेले आपले वैयक्तिक हितसंबंध जपले जावे यासाठी ठेकेदाराला अभय देवून सुरु असलेले निकृष्ठ दर्जाचे काम उत्कृष्ठ दर्जाचे असल्याची पावती सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी ठेकेदाराला देवून या ठेकेदाराचा बचाव करण्यासाठी कोल्हे गटाच्या उपनगराक्षांसह नगरसेवकांची फौज ठेकेदाराच्या बचावासाठी धावली आहे यामागचे गौडबंगाल काय आहे न समजण्यापलीकडचे आहे त्यामुळे यापुढील काळात कोपरगाव शहरात होणाऱ्या विकास कामांचा दर्जा किती गुणवत्तापूर्ण राहील याबाबत चिंता वाटत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवक राहुल शिरसाठ यांनी म्हटले आहे.



