ब्रेकिंग

वाढदिवस, आदरणीय डॉक्टर साहेबांचा!

अभ्यासू आणि सृजनशील नेतृत्वाचा!

वाढदिवस, आदरणीय डॉक्टर साहेबांचा!

अभ्यासू आणि सृजनशील नेतृत्वाचा!

कोपरगांव । विनोद जवरे ।

ज्यांना नेहमीच नेता नव्हे तर मित्र म्हटलं जातं त्याच कारणही तसंच आहे, कोणीही साहेबांशी अगदी सहज संपर्क साधू शकतं. आणि साहेब देखील प्रत्येकाच्या कॉल वर स्वतःच बोलून समस्या, प्रश्न जाणून घेणार!त्यांच्यासोबत काम करताना मला त्यांचे अनेक गुण भारावून टाकणारे होते, कुठलाही बडेजाव नाही, व्यक्तीच्या क्षमता जाणून घेत जबाबदारी देणे, कमतरता भरून काढण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी सहकाऱ्यांना उपलब्ध करून देणे, स्वतःला कायम व्यस्त ठेवणे, नाविन्याचा ध्यास, कायम सकारात्मक आणि व्यापक विचार, नवनवीन गोष्टी शिकत राहणे…

भल्या पहाटे उठून नित्य नियमाने व्यायाम करून शरीर आणि मनाला फिट ठेवत दिवसभरात अनेकांचे प्रश्न ते सोडवत असताना आपल्यापैकी कोणीही त्यांना थकलेले पहिले नसेल.5 जिल्ह्यातील आणि 5 जिल्ह्याबाहेरील कोणीही व्यक्ती मग ती पदवी क्षेत्रातील असेल, शिक्षक क्षेत्रातील असेल, अन्य नोकरदार क्षेत्रातील असेल, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व तत्सम कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असो त्यांचे हसतमुखाने व तोंडभरून स्वागत करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.‘प्रेम माणसाला देव बनवते’ पण साहेबांनी केलेल्या कामांमुळे आणि नेतृत्वामुळे डॉक्टर साहेब माणसातील खरे ‘देव माणूस’ बनले आहे! सदैव लोकांमध्ये रमणाऱ्या या माझ्या या स्फूर्तीस्थानाला जन्म दिनानिमित्त उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना!

– समीर कडलग
प्रमुख, सोशल मीडिया (आ.डॉ.सुधीर तांबे)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!