ब्रेकिंग
प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे – कोकाटे
के.बी.रोहमारे महाविद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे – कोकाटे

कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगांव तालुक्यातील जवळके येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डी. आर. सोनवणे यांचा अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका यांचा शिर्डी पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष महिला पोलिस अधिकारी योगिता कोकाटे मँडम यांचा शुभहस्ते महिला दिनानिमित्ताने सन्मान करण्यात आला.

प्रारंभी सर्व प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पुजन व दीपप्रज्वलन करत कार्यक्रमास सुरुवात झाली.आधुनिक काळात जग वेगाने पुढे जात असून त्यामध्ये महिलांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे असल्याचे शिर्डी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डी.आर.सोनवणे,प्रा. गोर्डे सर, प्रा.वाघ सर,प्रा.सचिन रहाणे सर,प्रा.मुकुंद हाडोळे सर,प्राध्यापिका शितल पोकळे,ऋषाली काथे,शितल नरवडे,मोहिनी गुडघे, निकीता जोंधळे,पुजा शेजवळ तसेच महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार विनोद जवरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.साबळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा.सातळकर यांनी मानले.