सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे – मा.मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेरात पत्रकारांशी संवाद

सरकारने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त केले पाहिजे – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेरात पत्रकारांशी संवाद
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभ पार पडला, त्यानंतर माजीमंत्री थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, सादर होत असलेल्या अर्थसंकल्पावर आमचे लक्ष आहे. अर्थसंकल्पात कर्जमाफीचा समावेश केल्यास आनंदच आहे. या सरकारने शेतकऱ्याला दुय्यम समजून वागणूक दिली. शेतकऱ्यांनी जागरूक होऊन एकत्रित येत आंदोलन उभे केल्यावर या सरकारला जाग येईल. देशात निर्माण होणारा आर्थिक ताण आज शेतकरी सोसत आहे. कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.सोनम वांगचूक, शंकराचार्य आणि राजकीय नेत्यांवर होत असलेली कारवाई राजकीय दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सरकार छळ करत आहे. सरकारच्या विरोधात जनतेने आवाज उठवला पाहिजे. निवडणुका सदोष पद्धतीने जाहीर केल्यानेच सर्वोच्च न्यायालयाने यात हस्तक्षेप केला. निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासकीय राजवट असून प्रशासक आपल्या मनमानी कारभार करत असून, लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा. आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांसाठी कॉम्रेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न ते सुटले पाहिजे, ही अपेक्षा साहजिकपणे त्यांची आहे. फक्त शिष्टमंडळ बोलावून समाधान नाही, प्रश्न सोडवून समाधान करावे, एवढीच अपेक्षा सरकारकडून आहे. तर संगमनेर अकोल्यातील जनतेत भांडण लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पुणे – नाशिक रेल्वे मार्गाबाबत माझ्या काळात झालेली आपली योग्य असून सरकारने संगमनेरवरून जाणाऱ्या या मूळ मार्गालाच पुन्हा मान्यता द्यावी. पुणे-नाशिक रेल्वेमार्गात खोडा घालू नये, असेही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.



