ब्रेकिंग

गौतम पब्लिक स्कूलची २० वर्षांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

गौतम पब्लिक स्कूलची २० वर्षांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
जाहिरात मो-7756045359
गौतम पब्लिक स्कूलची २० वर्षांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम
कोपरगांव । प्रतिनिधी । कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलने यंदाच्या एसएससी बोर्ड परीक्षेत पुन्हा एकदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाने सलग २० व्या वर्षी १०० % निकालाची दैदिप्यमान परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये अक्षय प्रकाश आवारे याने ९३.४० % गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. साहिल रतन जाधव याने ९०.६० % गुणांसह द्वितीय, तर वेदांत महेंद्र जाधव याने ९० % गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच मानस गोरख पाटील ८८.४० % आणि कार्तिक साहेबराव दाते ८७.६० %  यांनी देखील विशेष प्राविण्य मिळवत शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे.  गेल्या दोन दशकांपासून गौतम पब्लिक स्कूलने सातत्यपूर्ण शैक्षणिक दर्जा राखला आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आधुनिक शिक्षण, नैतिक मूल्ये, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन, तसेच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांवर विशेष भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे अथक परिश्रम, पालकांचे खंबीर सहकार्य आणि विद्यार्थ्यांची जिद्द हेच खरे यशाचे सूत्र आहे. शिक्षकांनी घेतलेल्या नियमित सराव परीक्षा, विशेष मार्गदर्शन वर्ग आणि प्रत्येक विद्यार्थ्यावर दिलेले वैयक्तिक लक्ष यामुळेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याने विद्यार्थ्यांनी ही यशाची परंपरा अखंड राखली असल्याचे प्राचार्य नूर शेख यांनी नमूद केले.  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे संस्थेचे चेअरमन माजी आ. अशोकराव काळे, विश्वस्त, आमदार आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे, इन्स्पेक्टर प्रा. नारायण बारे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. याच बरोबर संस्था सदस्यांनी प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!