ब्रेकिंग
ना.थोरात यांच्या प्रयत्नांतून निमगांवसह 7 गावांसाठीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 59 कोटी मंजुर
ना.थोरात यांच्या प्रयत्नांतून निमगांवसह 7 गावांसाठीच्या पाणी पुरवठा योजनेसाठी 59 कोटी मंजुर

संगमनेर । विनोद जवरे ।
विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून निमगाव बु, निमगाव खु, पेमगिरी, सावरचोळ, शिरसगाव धुपे, मेंगाळवाडी व नांदुरी दुमाला, मिर्झापूर या 8 गावांकरिता महाराष्ट्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 59 कोटी 6 लाख 73 हजार रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जि.प.सदस्य मिलींद कानवडे यांनी दिली आहेत.याबाबत अधिक माहिती देतांना कानवडे म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी कोरोनाच्या संकटानंतर निळवंडेच्या कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली आहे. रात्रंदिवस या कालव्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहे. नुकतेच निमगाव खुर्द येथील जलसेतूच्या कामाची पाहणी ना. थोरात यांनी केली आहे.

तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महाविकास आघाडी सरकार मधून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. याकामी इंद्रजितभाऊ थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. तालुक्यातील 171 गावे व 260 वाड्या-वस्त्यांवर नामदार थोरात व आमदार डॉ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांच्या अनेक योजना राबवल्या आहेत.महाराष्ट्र सरकारच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे निमगाव बुद्रुक ,निमगाव खुर्द, पेमगिरी, नांदुरी दुमाला, मिर्झापूर, शिरसगाव धुपे, सावरचोळ, मेंगाळवाडी या 8 गावांकरिता शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकत्रित पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेसाठी 59 कोटी 6 लाख 73 हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या या योजनेमुळे पश्चिम भागातील शिरसगाव धुपे या डोंगरावरील दुर्गम गावालाही न योजनेद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी या योजनेला भरीव निधी दिल्याबद्दल महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, जि प सदस्य मिलिंद कानवडे, एडवोकेट माधवराव कानवडे यांचे या आठही गावांमधील सरपंच ,उपसरपंच दूध संस्था, पतसंस्था व सोसायट्यांचे पदाधिकारी, युवक, महिला व नागरिकांनी अभिनंदन केले आहे.