ना.थोरात यांच्या पाठपुराव्यातून घुलेवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी 81 कोटी मंजुर
ना.थोरात यांच्या पाठपुराव्यातून घुलेवाडी पाणी पुरवठा योजनेसाठी 81 कोटी मंजुर
संगमनेर ( विनोद जवरे ) विधिमंडळ पक्षनेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून घुलेवाडी गावाकरिता महाराष्ट्र सरकारच्या जलजिवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत 81कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर व जि.प.सदस्य सिताराम राऊत यांनी दिली आहेत. याबाबत अधिक माहिती देतांना राऊत म्हणाले की, घुलेवाडी गावची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडी गावाकरीता स्वतंत्र पाणीपुरवठा योजना प्रवरा नदीवरून आणली आहे. घुलेवाडी गावामध्ये नवीन अद्यावत कोर्ट इमारत, पोलिस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय यांसह अनेक मोठमोठी विकास कामे मार्गी लागली आहेत.दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडेच्या कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली आहे .रात्रंदिवस या कालव्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहे.तालुक्यातील विविध विकास कामांसाठी महा विकास आघाडी सरकार मधून मोठ्या प्रमाणात निधी मिळवला आहे. याकामी इंद्रजित भाऊ थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला आहे. तालुक्यातील 171 गावे व 260 वाड्या-वस्त्यांवर नामदार थोरात व आमदार डॉ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामांच्या अनेक योजना राबवल्या आहेत.महाराष्ट्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत निमगाव , चंदनापुरी, वरवंडी ,तळेगाव ,सारोळे पठार गावांकरिता शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे यासाठी एकत्रित पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या आहेत. घुलेवाडी गावासाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना असून यासाठी 81 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महा विकास आघाडी सरकारच्या या योजनेमुळे संगमनेर तालुक्यातील सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत व विस्ताराने विभागलेली उपनगरे यांना अत्यंत सुरळीत व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.घुलेवाडी पाणीपुरवठा योजनेला भरीव निधी दिल्याबद्दल महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात, सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर जि प सदस्य सिताराम राऊत, सरपंच दत्तात्रय राऊत, उपसरपंच हरी ढमाले यांचे , युवक, महिला व नागरिकांनी अभिनंदन केले आहे ..