यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्यला मिळणार सन्मान – मा आ.डॉ.सुधीर तांबे

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून कौशल्यला मिळणार सन्मान – मा आ.डॉ.सुधीर तांबे


जयहिंद लोकचळवळीच्या उपक्रमातून स्वयंरोजगारास प्रोत्साहन

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण पूर्व शिक्षण मान्यता मूल्यांकन केंद्राची बैठक संपन्न झाली यावेळी केंद्राचे संचालक डॉ राम ठाकूर, डॉ. प्रकाश देशमुख, सौ दुर्गाताई तांबे, आतिक शेख ,डॉ दानिश शेख, ज्ञानेश्वर नाईक, भाईजान तांबोळी, अवेज खान, समन्वयक उबेद शेख, मोहसीन शेख,सौ. सुनीता कांदळकर अंजुम बागवान आणि सह विविध मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.सुधीर तांबे म्हणाले की शिक्षण ही भिंतीच्या आत मध्येच दिले जाते असे नाही तर परिस्थितीमुळे अनेक जण शिक्षणापासून वंचित राहू शकतात या सर्वांना शिक्षणातून सन्मान मिळाला पाहिजे याकरता मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून संगमनेर मध्ये शैक्षणिक प्रमाणपत्र केंद्र सुरू झाले आहे.अनेक युवक कारागीर यांना विविध कौशल्य पूर्णपणे अवगत असतात परंतु शैक्षणिक प्रमाणपत्र त्यांच्याकडे नसते एखादी व्यक्ती उच्चशिक्षित अभियंता पेक्षाही उत्कृष्ट मेकॅनिक असतो. किंवा महिला भगिनी कोणतेही शिक्षण न घेता ही उत्कृष्ट टेलरिंग, ब्युटी पार्लर अशी कामे करतात. या सर्वांच्या कौशल्याला प्रमाणपत्राचा आधार मिळावा आणि त्यांचा शिक्षणातून सन्मान व्हावा या उद्देशाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयांमध्ये कौशल्य आधारित प्रमाणपत्र मिळणार आहेत याकरता शिक्षणाची मोठी अट नसून इच्छाशक्ती महत्त्वाची आहे.अनेक तरुण-तरुणी औपचारिक यांचे औपचारिक शिक्षण नसले तरी त्यांना इलेक्ट्रिशियन, फिटर, वायरमन, प्लंबर, टेलरिंग अशा विविध क्षेत्रात प्रवीणतेने काम करत आहेत. त्यांना या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा नक्कीच उपयोग होणार आहे. जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून युवकांमध्ये कौशल्य निर्मिती बरोबर स्वयंरोजगारास प्रोत्साहन मिळावे याकरता या माध्यमातून काम सुरू असल्याचे माजी आमदार डॉ.तांबे म्हणाले. तर संचालक डॉ राम ठाकूर म्हणाले की मुक्त विद्यापीठाने अनेकांच्या जीवनामध्ये शैक्षणिक समृद्धी बरोबर आनंद निर्माण केला आहे. चार भिंतीच्या आतील शिक्षण दैनंदिन कामातून दिले जात असल्याने वेळ आणि खर्च वाचत असून यामुळे अनेकांना आपला रोजगार व्यवसाय सांभाळता येत आहे संगमनेर मधील हा उपक्रम नक्कीच अनेकांना संधी देणारा ठरणार असल्याचे ते म्हणाले
अहिल्यानगर जिल्ह्यातील युवकांना कौशल्य शिक्षणाची नवी संधी
अहिल्या नगर जिल्ह्यासह राज्यामध्ये अनेक युवकांमध्ये चांगली कौशल्य असून फक्त प्रमाणपत्र अभावी त्यांना वाव मिळत नाही.म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या मूल्यांकन केंद्राच्या माध्यमातून या सर्व तरुणांना सन्मान मिळणार असल्याचे समन्वयक उबेद शेख यांनी म्हटले आहे.
आमच्या व्यवसायाला प्रमाणपत्रामुळे बँकिंगचे पाठबळ मिळेलमी पेंटिंग व्यवसाय करत असून संगमनेर तालुक्यासह विविध तालुक्यांमध्ये माझे काम चांगले सुरू आहे मात्र माझ्याकडे प्रमाणपत्र नसल्याने बँकिंग मधून कर्ज उपलब्ध साठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत या नवीन केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक प्रमाणपत्रामुळे मला बँकिंग कर्जासाठी नक्कीच फायदा होईल असा विश्वास किरण सातपुते सुकेवाडी यांनी व्यक्त केला आहे.
तर मी अनेक दिवस घरामध्ये टेलरिंगचे काम करत असून यामुळे ब्युटी पार्लर व टेलरिंग कामांमध्ये शिक्षण प्रमाणपत्राच्या माध्यमातून माझ्या कामाला सन्मान मिळेल इतकेच नव्हे तर मला माझ्या व्यवसायाच्या बोर्डवर माझे शिक्षण देता येईल हे माझ्यासाठी अभिमानास्पद राहील असे घुलेवाडी येथील उषा ढमाले यांनी म्हटले आहे.


