ब्रेकिंग

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर  ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ -माजी आमदार अशोकराव काळे

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर  ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ माजी आमदार अशोकराव काळे

विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर  ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ माजी आमदार अशोकराव काळे

कोपरगांव । प्रतिनिधी । आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात, विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या युगात आपण पुढे जात असतांना  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची जाणीव अधिक प्रकर्षाने होते.समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी शिक्षण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले असून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले आहे.

महामानवभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माजी आमदार अशोकराव काळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर त्यांनी भारतीय समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला उभारी दिली. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजच्या तरुणांसाठी अधिकच प्रेरणादायी आहे.त्यांचे जीवन म्हणजे कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास यांचे जिवंत उदाहरण असून त्यांच्या संघर्षातूनच आपल्याला प्रेरणा घेऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील कार्यक्रम प्रसंगी पंचायत समितीचे माजी उपसभापती वाल्मिकराव कोळपेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहेरखांबसुरेगावच्या सरपंच सौ.सुमन कोळपे, उपसरपंच सीमा कदम, माजी सरपंच शशिकांत वाबळे, सचिन कोळपे,पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक रविंद्र निकमयशवंत निकम,अंबादास धनगरराजेंद्र मेहेरखांब,दादासाहेब जगताप,दिलीप शरमाळेसंजय ढोणेपत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब,मोतीराम निकमराहुल डोखेकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखानाभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव उपसमितीचे अध्यक्ष परसराम मेहेरखांबउपाध्यक्ष महेश निकमसचिव अरुण लोंढेखजिनदार राहुल बनकरबाळनाथ साळवेमनोज साळवे,शिवाजी साळवेनरेंद्र गडवे, सुभाष डोलारे, प्रवीण गायकवाड, प्रवीण मेहेरखांब,कैलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!