ब्रेकिंग
निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार
पालकमंत्र्यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा
निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

पालकमंत्र्यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा
शिर्डी । अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून १५ एप्रिलपासून पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.