ब्रेकिंग

कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे अमोल वाळूंज यांची बिनविरोध निवड 

कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे अमोल वाळूंज यांची बिनविरोध निवड 

जाहिरात मो-7756055359
कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काळे गटाचे अमोल वाळूंज यांची बिनविरोध निवड 

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिपक चौधरी यांनी रोटेशननुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी काळे गटाचे अमोल विठ्ठलराव वाळूंज यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कान्हेगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच गणेश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलीयावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारि वेळेत अमोल वाळूंज यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक प्रकाश जाधव यांनी अमोल वाळूंज यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

यावेळी सरपंच, सर्व सदस्य व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अमोल वाळूंज यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सरपंच गणेश सोनवणे, मावळते उपसरपंच दिपक चौधरी, ग्रा.प.सदस्य संध्या सांगळे, चित्र भाकरे, मालन मगर, जयश्री बाळासाहेब पवार, नंदकुमार आव्हाड, प्रदीप हिवराठे, विशाल पांडव, बबन सांगळे, लक्ष्मण चौधरी, देवचंद कढेकर, दत्तात्रय वाळुंज, संतोष वाळुंज, संदीप वाळुंज, बबन वाळुंज, शरद सांगळे, दत्तात्रय मगर, प्रभाकर भाकरे, अशोक काजळे, संदिप काजळे, गणेश करडे, प्रसाद चौधरी, रमेश काळे, सागर शिंदे, योगेश जगताप, सचिन चौधरी, अक्षय भाकरे, संकेत भाकरे, शुभम चौधरी, माधव चौधरी, मनोज काजळे, किरण वाळूंज, बाबासाहेब काजळे, संदीप भाकरे, डॉ. लहिरे, डॉ. काळे, रमेश सोळसे, सुनील काजळे, अनिल काजळे आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व कान्हेगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच अमोल वाळूंज यांचे मा. आ. अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उपसरपंचपदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित उपसरपंच अमोल वाळूंज यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. ज्या विश्वासाने माझ्यावर उपसरपंचपदाची जबाबदारी सोपविली त्या विश्वासाला तडा जावू न देता सरपंचसर्व सदस्य यांच्या सहकार्यातून कान्हेगाव ग्रामस्थांना अपेक्षित असलेला विकास करून दाखवू व टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!