अभ्यासू सृजनशील व्यक्तीमत्व – आ.डॉ.सुधीर तांबे
अभ्यासू सृजनशील व्यक्तीमत्व – आ.डॉ.सुधीर तांबे
कोपरगांव । विनोद जवरे ।
निरोगी समाजानिर्मीतीसाठी जयहिंद लोकचळवळीच्या माध्यमातून युवा संघटन,युवाउपक्रम,आरोग्य शिबीरे,बचत गट चळवळ,क्रिडा स्पर्धा,सांस्कृतीक स्पर्धा,नोकरी विषयक मेळावे,व्यक्तीमत्व विकास शिबिरे,वाचन मंडळ,अभ्यास मंडळ असे विविध उपक्रम राबवून समाजातील अ-ाान, अंधश्रध्दा,अस्वच्छता या विषयांवर जागृती करुन करुन निकोप व निरोगी समाज निर्मीतीसाठी कार्यरत असणारे नाशिक पदवीधर मतदार संघाचे मनमिळावू स्वभावाचे आ.डॉ.सुधीरजी तांबे साहेब हे समाजकारणातील अभ्यासू व सृजनशील व्यक्तीमत्व म्हणून संपुर्ण महाराष्ट्राला परिचीत झाले आहे.
प्रत्येकासाठी आरोग्य हि जगातील सर्वात मोठी संपत्ती असून वैद्यकिय सेवाही जनसेवा म्हणून काम करतांना जनतेच्या आग्रहाखातर नगराध्यक्ष ते विधान परिषद सदस्य या काळात साहित्य संस्कृती वाचन यांची आवडही त्यांनी जपली.2009 मध्ये नाशिक पदवीधर मतदार संघातून पुरोगामी विचारांच्या व टीडीएफच्या वतीने निवडणूक लढविणारे आ.डॉ. तांबे साहेब यांनी 2010 मध्ये पुन्हा एकदा याच मतदार संघातून ऐतहासिक विजय मिळविला.संगमनेर तालुक्याला थोर स्वातंत्र्य सेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या समृध्द विचारांचा वारसा लाभला आहे. त्याच्या विचारांवर काम करत राज्याचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी महसूल सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी सांभाळतांना संपुर्ण नगर जिल्ह्याला अभिमानास्पद असे काम राज्यात केले आहे. आज उभा महाराष्ट्र त्यांच्या सुस्कृंत नेतृत्वाकडे मोठ्या आशेने पाहतो आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आ.डॉ.तांबे साहेब यांनी काम करतांना तळागळातील माणसाला केंद्रबिंदुमाणून विकासाची गंगा त्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे.
संस्कृत राजकारणाचा वसा त्यांनी जपला आहे. म्हणून तर खान्देशातील चोपडा,रावेर,ते नगरमधील जामखेडपर्यंत ते लोकप्रिय ठरले आहेत. सतत हसत मुख स्वभाव ,सहज होणारा संपर्क आणि कामाच्या पाठपुराव्याची पध्दत यामुळे पाच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात साहेब लोकप्रिय झाले असून या तालुकयांमधील कार्यकर्त्यांचा सतत ओघ आहे.
विधान परिषदेत काम करतांना शिक्षक सेवकांच्या मानधनाची वाढ ,सर्वांसाठी आरोग्य विमा योजना, बेरोगार महामंडळ,1 जाने 2005 पासून सर्व कर्मचार्यांना निवृत्ती वेतन योजना लागू अशा विविध महत्वांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करुन ती मार्गी लावली आहे. विनाअनुदानीत शाळांचे प्रश्न तसेच तेथे काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न सातत्याने आग्रहपुर्वक मांडणी करुन मार्गी लावले आहे.डॉक्टर,वकील,शासकीय ,निमशासकीय कर्मचारी ,शेतकरी,विद्यार्थी,महिला ,तरुण,अशा अनेकांच्या विविध अडचणी तत्परतेने सोडवितांना संबधीत प्रश्नांसाठी केलेला पाठपुरावा प्रत्येकाच्या आयुष्यात ठेवा म्हणून जपला जात आहे.यामुळे सातत्याने मानसे जोडली जात आहे. काम करतांना आ.डॉ.तांबे साहेब कधीच कोणताही भेदभाव करत नाही. यामुळे पक्षविरहीत अनेक कार्यकर्ते जिवलग मित्र झाले आहेत.
संपुण खांन्देशात आ.डॉ.तांबे साहेब यांच्या रुपाने जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. ना.थोरात साहेब रायात महत्चाची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे खांदेशातील अनेक प्रश्न आ.डॉ.तांबे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहे. अफाट स्मरण शक्ती ही सर्वांना आचंबीत करणारी आहे.एकदा भेट झाली की नाव घेवुन हाक मारण्याची पध्दत यामुळे उत्तर महाराष्ट्रात अनेक युवक पहिल्या भेटीला तांबे साहेबांचे चाहते झाले आहेत.मा.नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांची आ.डॉ.तांबे साहेबांना अनमोल साथ मिळाली साहेबांच्या यशात महत्वपुर्ण वाटा उचलतांना महिला सबलीकरणासाठी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले आहेत.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक असणार्या आ.डॉ.तांबे साहेबांनी हे अभियान सातपूडा पर्वतांपर्यत पोहचविले.एक प्रेमळ मनाचा माणून म्हणून सर्व युवापीढी आ.डॉ.तांबे साहेब यांच्या कडे बघत आहे. प्रत्येक गोष्टीतील अभ्यास,नवनविन तंत्र-ाानाची माहिती,मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे युवकांचे आयकॉन म्हणून आ.डॉ.तांबे साहेब हे सर्वांपुढे आदर्शवत आहेत.त्यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी परीवाराच्या लाख लाख शुभेच्छा !!