ब्रेकिंग

नसरापूर दुर्घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅण्डल मार्च

आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्या, महाराष्ट्रात महिला असुरक्षित   - डॉ जयश्रीताई थोरात

नसरापूर दुर्घटनेच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये कॅण्डल मार्च

आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा द्या, महाराष्ट्रात महिला असुरक्षित   – डॉ जयश्रीताई थोरात
संगमनेर । प्रतिनिधी ।  पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे अल्पवयीन चिमुकलीवर वृद्ध नागरिकाने केलेला अत्याचार हा महाराष्ट्रासाठी काळीमा फासणारा आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी अत्यंत कठोर कायदा करणे गरजेचे असून अशा नराधमांना तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांनी केली असून नसरापूर घटनेच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये भव्य कॅण्डल मार्च  काढण्यात आला.

संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिक व महिलांच्या वतीने संगमनेर बसस्थानक येथे नसरापूर घटनेच्या निषेधार्थ भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या याप्रसंगी सौ दुर्गाताई तांबे , नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे ,शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा ,शेखर सोसे, नगरसेवक किशोर टोकसे, विशाल ढोले,  सिद्धेश घाडगे ,मनीषा राहणे, प्रियंका जगनर, वनिता गाडे ,विशाल ढोले प्रकाश कडलग, प्राची कवडे ,अर्चना दिघे, प्राजक्ता कुलकर्णी, तनिष्का कुलकर्णी, समीर कुलकर्णी, ललित शिंदे ,शर्मिला हांडे, सुभाष दिघे प्रीतम साबळे ,प्राजक्ता घुले, वृषाली साबळे ,डॉ. अनुराधा सातपुते, सौ सरोज पगडाल, सौ नंदा गरुडकर, यशवंती नरवडे ,श्रीकांत साबळे, शरद पावबाके, सोमनाथ गोडसे ऋत्विक राऊत, शुभम शिंदे ,मयूर घुले, अलोक बर्डे, सुरभी मोरे, वैशाली कडबाने ,अमृता राऊत, तात्याराम कुटे आदींसह  शेकडो नागरिक व महिला उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत महिलांवर अन्याय होतो आहे. विकसित भारत प्रगतशील भारत अशी घोषणा दिली जाते मात्र यामध्ये महिलांवर अत्याचार वाढत आहे. गुन्हेगाराला कोणतीही जात धर्म नसतो अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. या लहान मुलीचा काय दोष होता ? असा सवाल करताना घटनेतील नराधमाला अत्यंत कठोर शिक्षा झाली पाहिजे याबरोबर यापुढील काळात महिलांवर कोणताही अत्याचार होणार नाही याकरता कठोर कायदे निर्माण झाले पाहिजे. देशामध्ये दररोज महिलांवर अत्याचार होत आहेत सरकार कोणतीही ठोस कारवाई करत नाही वडगाव पान येथील चिमुकलीवर ऍसिड फेक  हल्ल्याला 45 दिवस होऊन गेले तरी आरोपी अद्याप सापडत नाही. हे दुर्दैवाचे असून छत्रपती शिवाजी महाराज महिलांवरील अत्याचारासाठी चौरंगा करण्याची शिक्षा द्यायचे त्याचप्रमाणे अत्यंत कठोर शिक्षा या घटनेतील आरोपींना द्याव्या अशी मागणी त्यांनी केली.तर सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या  की,  मुली सुरक्षित नाहीत लहान मुलींनी शाळेत जायचे कसे. महिला सुरक्षित नाहीत. दिवसेंदिवस महिलांवर वाढणारे अत्याचार हे अत्यंत दुर्दैवी आहे या अत्याचारातील नराधमांना मृत्यू दंडापेक्षाही कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून यापुढे कोणीही अशी अत्याचार करण्याची हिम्मत करणार नाही.

तर डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, एक आई म्हणून, एक  स्री म्हणून मुलींची काळजी वाटत आहे सरकारने वेळ न दवडता तातडीने अत्यंत कठोर कारवाई येणारा धमाल करावी त्याचप्रमाणे यापुढील काळात महिलांची काळजी घेणारे कायदे कातडीने निर्माण करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी उपस्थित लहान मुलींच्या हस्ते निवेदन स्वीकारले .यावेळी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.  या कॅन्डल मोर्चासाठी संगमनेर शहर व तालुक्यातील विविध नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!