सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे – मा कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची जगन्नाथ पुरी येथे प्रार्थना

सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी सुखी होऊ दे – मा कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची जगन्नाथ पुरी येथे प्रार्थना

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी घेतले जगन्नाथ पुरी येथे दर्शन
ओडिसा येथील जगप्रसिद्ध श्रीक्षेत्र पुरी मधील जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील भाविकांची आढळत श्रद्धा असलेली मोठी रथयात्रा आहे. शतकानूशतके चालत आलेली ही पवित्र परंपरा भारताच्या समृद्ध व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवत असते. समाजातील सर्व मानव जातीला समता सेवा प्रेम भक्तीचा संदेश देणारी ही यात्रा असून या यात्रेला महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन दर्शन घेतले.याप्रसंगी जगन्नाथ पुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्राचे माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी ओरिसा राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ नेते आणि शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, संपूर्ण देशामध्ये यावर्षी अलनिनोचा प्रभाव जाणवतो आहे. यामुळे काही भागांमध्ये पाऊस झाला नाही. तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री खोरे वगळता इतर भागांमध्ये अजूनही पाऊस नाही. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. ओडिसा राज्यातही पाऊस कमी झालेला आहे. देशातील शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून पाऊस चांगला झाला तर तो सुखी समाधानी असतो. चांगल्या पावसामुळे सर्व राज्यांमधील नागरिक आनंदी व सुखी समाधानी होतात. पशुपक्षी प्राणी आनंदी होतात. म्हणून देशभरात चांगल्या पावसाची गरज आहे. संपूर्ण देशावर आलेले अलनिनोचे संकट जगन्नाथ पुरी महाराजांच्या कृपेने दूर होऊन महाराष्ट्र, ओरिसा सह सर्व राज्यांमध्ये चांगला पाऊस पडावा व शेतकरी सुखी समाधानी व्हावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी जगन्नाथ महाराजांच्या चरणी केली.याचबरोबर मानवता हा धर्म महत्त्वाचा असून जात-पात भेदभाव न मानता सर्व माणूस समान आहे. समता, सेवा, प्रेम आणि भक्तीचा संदेश देणारे हे भक्तिमय वातावरण असल्याचे ते म्हणाले. यावेळी विविध राज्यांमधील भक्तगण व जगन्नाथ पुरी रथामध्ये लाखोंची उपस्थिती होती.



