आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 32 लाख रु निधी मंजूर
आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 32 लाख रु निधी मंजूर
संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते व माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सरकारमधून मोठा निधी मिळत तालुक्यातील वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 या अंतर्गत रस्ते विकास व मजबुतीकरण करण्यासाठी 1 कोटी 32 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे .
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात विकास कामांचा वेग कायम आहे .तालुका हा विस्ताराने मोठा असून तालुक्यातील 171 गावे व 250 च्या पुढे वाड्या वस्ती आहेत.
महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निळवंडे कालव्याच्या कामाला अत्यंत गती देऊन हे काम रात्रंदिवस सुरू ठेवले होते. ऑक्टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी आणण्याचे ध्येय आमदार बाळासाहेब थोरात यांनी ठेवले होते. याचबरोबर तालुक्यातील विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला होता. मात्र सरकार बदलले आणि विकास कामांना काहीशी स्थगिती मिळाली होती.तरीही विकास कामांचा पाठपुरावा ठेवत सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना 2022- 23 मधून अंभोरे ते रणखांबवाडी रस्त्याची सुधारणा व मो-यांचे बांधकाम करणे याकरता 50 लाख रुपयांचा निधी, घुलेवाडी गावांतर्गत कानिफनाथ मंदिर ते शंकर टाऊनशिप रस्ता सुधारणे करता 14 लाख रु. , तळेगाव ते धनगरवाडी रस्ता सुधारणा करणे 25 लाख रुपये. मालुजे ते हंगेवाडी रस्त्याचे डांबरीकरण करणे दहा लाख आणि संगमनेर ते घुलेवाडी ग्रा.मा.21 रस्ता साई श्रद्धा चौक ते कानिफनाथ मंदिर चौक सुधारणा करणे 35 लाख असे 1 कोटी 32 लाख रुपयांचा निधी ला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.वरील कामे तातडीने सुरू होणार असल्याने अंभोरे, रणखांबवाडी, घुलेवाडी ,तळेगाव ,धनगरवाडी, मालुंजे, हंगेवाडी, साईश्रद्धा चौक, या परिसरातील नागरिकांनी राज्याचे नेते व माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.