पाचोरे परिवाराचा आदर्श उपक्रम – आमदार सुधीरजी तांबे
सरपंच विक्रम पाचोरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम
कोपरगाव तालुक्यातील बहादरबाद येथील युवा सरपंच विक्रम जयराम पाचोरे यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही सामाजिक भावना मनात ठेवून वाढदिवसाचे औचित्य साधत गावात विविध सामाजिक उपक्रम राबवत आपला वाढदिवस साजरा करत एक अनोखे उदाहरण सर्वाना दिले आहे.
सरपंच विक्रम पाचोरे यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाना फाटा देत जे सामाजिक काम स्वीकारले आहे ते खरंच कौतुकास्पद असून विक्रम पाचोरे हे एक युवा सरपंच असून त्यांचा बहादराबाद गावातील तसेच परिसरातील सामाजिक कामांमध्ये नेहमीच सहभाग असतो. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त बहादरबाद येथील वैकुंठ भूमी परिसरात व गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते अनेक प्रकारच्या देशी वृक्षाची मोठया प्रमाणात लागवड केली तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सी.सी.टी.व्ही चे लोकार्पण यावेळी करण्यात आले. या वेळी उपस्थित गावातील मंडळींनी सरपंच पाचोरे यांच्या कार्याविषयी समाधान व्यक्त करत सरपंच पाचोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी चेअरमन साहेबराव पाचोरे, पोलीस पाटील आप्पासाहेब पाचोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाचोरे, उपाध्यक्ष शितल खंडीझोड,ग्रामविकास अधिकारी अनिता दिवे,प्राध्यापक बाळासाहेब आहेर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापीका मंगल गोपाळे, सहशिक्षिका स्वाती गुळवे,कैलास पाचोरे, संदीप पाचोरे, सोमनाथ पाचोरे, सचिन पाचोरे,दिपक औराटे, जोंधळे तात्या, संजय पाचोरे, तात्यासाहेब पाचोरे, लक्ष्मण पाचोरे, पंकज जोंधळे, दत्तात्रय पाचोरे,आण्णासाहेब पाचोरे, बाबासाहेब पाचोरे, वाल्मिक पाचोरे,रविंद्र कुरकुटे, बाबासाहेब पाचोरे, ज्ञानदेव पाचोरे,उल्हास पाचोरे,किरण पाचोरे,राहुल पाचोरे,सुरेश पाचोरे,राजेंद्र पाचोरे,काका पाचोरे ,अजित पाचोरे आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल पाचोरे व आभार स्वाती गुळवे यांनी मानले.